दिवसभराच्या चौकशीनंतर ईडी कडून संजय राऊत यांना अटक

दिवसभराच्या चौकशीनंतर ईडी कडून संजय राऊत  यांना अटक
मुंबई
लोकमानस प्रतिनिधी 
रविवारी सकाळपासून दिवसभरात केलेल्या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली.
रविवारी सकाळी राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी ईडीने छापा मारला व रोख रक्कम जप्त केली.
त्यानंतर सायंकाळी त्यांना ईडीच्या नेण्यात आले  व   कार्यालयात सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणी १०३४ कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी करुन ही कारवाई करण्यात आली आहे. 
शिवसेनेचा व संजय राऊत यांचा आवाज दाबण्यासाठी ही अटकेची कारवाई करण्यात आली. खोटे पुरावे दाखवून ही अटक करण्यात आली मात्र आम्ही शेवटपर्यंत लढत राहु व शेवटी सत्याचाच विजय होईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केली. 
सोमवारी सकाळी राऊत यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले जाईल व त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही