केंद्रीय वक्फ कॉन्सिलच्या वसीम खान यांचा विक्रोळीत सत्कार

 

 केंद्रीय वक्फ कॉन्सिलच्या वसीम खान यांचा विक्रोळीत सत्कार

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – केंद्रीय वक्फ कॉन्सिलचे सदस्य तथा भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांचा नुकताच विक्रोळी मध्ये सत्कार करण्यात आला.

शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रलंबित समस्या, विक्रोळी परिसराला भेडसावणारा मुस्लिम कब्रस्तानचा प्रश्न, शैक्षणिक संस्थांची वाढती गरज अशा विविध बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.

विक्रोळी टागोर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आसिफ कुरैशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ऑल इंडिया यूनियन चे अध्यक्ष विनायक कामत उपस्थित होते. चर्चेदरम्यान मांडण्यात आलेल्या समस्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मांडून त्यावर मार्ग काढण्यात येईल,अशी वसीम खान यांनी ग्वाही दिली.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब