सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला

 

सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १ ऑगस्टला

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या याचिकेवर पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. दोन्ही बाजूंना मुद्दे मांडण्यासाठी व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडल्याने राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी तर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील बुधवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही