समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी यांची निवड

 


समाजवादी पक्षाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी  यांची निवड

लोकमानस प्रतिनिधी

मुंब्रा

समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षपदी नूर अहमदी चौधरी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नूर यापूर्वी प्रभाग क्रमांक ३० च्या पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. समाजवादी पक्षाचे मुंब्रा कळवा अध्यक्ष आदिल खान आझमी,कार्याध्यक्ष कलिम जामई व पदाधिकारी राशिद खान यांच्या उपस्थितीत चौधरी यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या निर्देशानुसार चौधरी यांना महिला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.


नूर चौधरी म्हणाल्या, पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दिलेल्या या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने सांभाळण्यात येईल. मुंब्रा कळवा विभागातील नागरिकांच्या व विशेषतः महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू, असे त्या म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही