मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतली शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा केली.सायंकाळी मुख्यमंत्री या खासदारांसह भाजप श्रेष्ठींची भेट घेतील अशी शक्यता आहे. सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन संवाद साधणार आहेत त्यावेळी या खासदारांच्या राजकीय वाटचालीबाबत ते माहिती देतील अशी शक्यता आहे. शिंदेंच्या भेटीस १२ खासदार उपस्थित असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

शिंदे गटासोबत असलेल्या शिवसेना खासदारांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने, हेमंत पाटील, संजय मंडलिक, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाणे, श्रीरंग बारणे, राजेंद्र गावित, प्रताप जाधव यांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे लोकसभेमध्ये विनायक राऊत गटनेते आहेत तर राजन विचारे प्रतोद आहेत. शिंदे गटातर्फे भावना गवळी यांना प्रतोद तर राहुल शेवाळेंना गटनेतेपदी नियुक्त केले जाणार आहे, त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही