द्रौपदी मुर्मू देशाच्या नवीन राष्ट्रपती, यशवंत सिन्हा यांचा पराभव

द्रौपदी मुर्मू देशाच्या नवीन राष्ट्रपती, यशवंत सिन्हा यांचा पराभव

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  विजयाच्या मार्गावर आहेत.   विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा पराभवाच्या छायेत आहेत. आदिवासी समाजातातून येणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती बनण्याचा मान त्यांना मिळाला आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देशभरात मतदान झाले होते.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांना एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. 


मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांनी विजय मिळवला होता.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारतील.

संसद भवनात या निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली.   

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब