२०१४ मध्ये चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळीसाठी भरलेली थकबाकी रक्कम त्वरित परत द्या, मुंबई रेशन दुकानदार संघटनेच्या नवीन मारु यांची मागणी

 

२०१४ मध्ये चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळीसाठी भरलेली थकबाकी रक्कम त्वरित परत द्या,  

मुंबई रेशन दुकानदार संघटनेच्या नवीन मारु यांची मागणी

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – २०१४ मध्ये  रेशन दुकानदारांनी चणा डाळ, उडद डाळ व तूर डाळी साठी भरलेली व आतापर्यंत थकबाकी असलेली रक्कम त्वरित देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी मुंबई रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

२०१४ मध्ये शिधावाटप दुकानदारांनी शिधावाटप अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार   महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनमध्ये पैसे आरटीजीएस द्वारे पाठवले होते. मात्र त्यावेळी पैशांच्या प्रमाणात डाळ उपलब्ध झाली नसल्याने भरलेले पैसे दुकानदारांना परत करण्याची गरज आहे. मात्र २०१४ पासून अद्यापपर्यंत हे पैसे परत मिळालेले नसल्याने हे पैसे त्वरित परत देण्याची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी सरकारकडे केली आहे. ही रक्कम सुमारे सव्वा चार कोटी रुपये असल्याची माहिती मारु यांनी दिली.


याबाबत, संघटनेच्या पत्रानंतर व पाठपुराव्यानंतर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहाय्यक संचालकांनी याबाबत सर्व शिधावाटप  उप नियंत्रकांना पत्र लिहून, रेशन दुकानदारांनी मार्केटिंग फेडरेशनकडे जमा केलेल्या रक्कमेची खातरजमा करुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. मात्र अद्याप त्यापुढील प्रक्रिया सुरु झालेली नसल्याने रेशन दुकानदारांमध्ये अस्वस्थता आहे. ही रक्कम त्वरित मिळावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नवीन मारु यांनी केली आहे.

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही