पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप पुन्हा सुरु करा - डॉ. भालचंद्र मुणगेकर सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाचा इशारा

 मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप पुन्हा सुरु करा -  डॉ. भालचंद्र मुणगेकर  सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाचा इशारा  प्रतिनिधी - मुंबई:  केंद्र सरकारने 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायातील इयत्ता 1 ते 8 मधील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती रद्द केली आहे. याशिवाय, भारत सरकारने अल्पसंख्याक समुदायातील संशोधकांसाठी मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप देखील बंद केली आहे. विशेष म्हणजे सच्चर समितीच्या शिफारशी लागू करण्याचा भाग म्हणून या दोन्ही उपाययोजना यूपीए सरकारच्या काळात करण्यात आल्या होत्या. याबाबत ‘छात्रवृत्ति जनआंदोलन समिती’ने आज पत्रकार परिषदेत माहिती देऊन याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.  पत्रकारांना संबोधित करताना  सरफराज आरजू म्हणाले की, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे अप्रामाणिकपणाशिवाय काही नाही आणि ही यंत्रणा दुर्बल घटकातील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हज सबसिडी रद्द केल्यानंतर हा पैसा अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी खर्च केला ज

जमात ए इस्लामी तर्फे रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

  जमात ए इस्लामी तर्फे रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन प्रतिनिधी जमात ए इस्लामी तर्फे कौसा येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. शुक्रवारी शालेय गटातील स्पर्धेला प्रारंभ झाला. शालेय गटात १६ संघ व वरिष्ठ गटात १६ गट अशा एकूण ३२ संघांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होईल.     शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस ही स्पर्धा होईल. शालेय गटातील विजेत्या संघाला पाच हजार रुपये व उप विजेत्या संघाला तीन हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर, वरिष्ठ गटातील विजेत्या संघाला तीस हजार रुपये व उप विजेत्या संघाला वीस हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. जमात ए इस्लामी हिंदतर्फे या स्पर्धेचे गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येते. खेळांच्या माध्यमातून समाजातील तरुणाईला विधायक मार्गाकडे वळवण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईटस (एपीसीआर) चे सचिव अस्लम गाझी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण केले जाईल.  

देवगड मध्ये 8 जानेवारीला सुन्नी इज्तेमाचे आयोजन, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

देवगड मध्ये 8 जानेवारीला सुन्नी इज्तेमाचे आयोजन,  महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था  प्रतिनिधी  देवगड मध्ये 8 जानेवारी रोजी एक दिवसीय सुन्नी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच देवगड येथे सुन्नी दावते इस्लामीचा एक दिवसीय तरबियाती इज्तेमा 8 जानेवारीला होत आहे.  सुन्नी दावते इस्लामीचे प्रमुख मोहम्मद शाकीर नूरी,  सुन्नी दावते इस्लामी, मालेगावचे सय्यद अमीनुल कादरी निग्रान, कारी मोहम्मद रिझवान खान या इज्तेमामध्ये मार्गदर्शन करतील.  दुपारी ३ पासून महिला वर्गासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार  8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा इज्तेमा चालेल.   देवगड मधील डायमंड हॉटेलच्या मागे इंद्र प्रसाद हॉल येथे हा इज्तेमाचा कार्यक्रम होईल.  सर्व मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे असे आवाहन सुन्नी दावते इस्लामी, देवगड कमिटी यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी  9921859594, 9819846678, 9137683903 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

उन्नती वैरागीला सिकई मार्शल आर्ट च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

इमेज
उन्नती वैरागीला सिकई मार्शल आर्ट च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मुंब्रा – प्रतिनिधी उन्नती दिपक वैरागी हिला राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे. १७ वर्षांखालील मुली या गटात तिला हे यश मिळाले आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रातून राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी उन्नती ही एकटी मुलगी ठरली आहे. उन्नतीचे वडील दिपक नंदकिशोर वैरागी हे ठाणे पोलिस दला मध्ये नोकरीस आहेत. उन्नतीचे कराटे चे प्रशिक्षक संतोष भोर तसेच सौरव सर    यांचे उन्नतीला उत्तम मार्गदर्शन मिळाले.      ठाणे पोलिस स्कूल मध्ये ९ वी मध्ये शिकत असलेली १५ वर्षीय उन्नती वयाच्या पाचव्या वर्षा पासून कराटे चे प्रशिक्षण घेत आहे. तिचे ब्लॅक बेल्ट डॅन  2  पर्यंतचे प्रशिक्षण झाले आहे. सिकई मार्शल आर्टचे प्रशिक्षण ती गेल्या ३ महिन्यांपासून घेत आहे. फिट राहण्यासाठी ती पहाटे साडेचार वाजता उठून स्किपींग करुन स्ट्रेचिंगचा सराव करते.   १४ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उन्नतीने सुवर्ण पदक पटकावत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. १९ डिसेंबरला झालेल्या विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक प

आझाद मैदानात आता केवळ दोन दिवसीय इज्तेमा, महाविकास आघाडीच्या महामोर्चामुळे निर्णय

इमेज
  आझाद मैदानात आता केवळ दोन दिवसीय इज्तेमा,  महाविकास आघाडीच्या महामोर्चामुळे निर्णय लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरच्या  महामोर्चामुळे सुन्नी दावते इस्लामीला आपली ३० वर्षांची परंपरा खंडित करावी लागली आहे. तीन दिवसीय इज्तेमाऐवजी त्यांना आता केवळ दोन दिवसीय इज्तेमा घ्यावा लागत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत काढलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ व राज्यपालांना पदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी व राज्य सरकारच्या बोटचेप्या भूमिकेविरोधात महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाचा फटका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्य सरकार यांना बसेल की नाही हे नंतर स्पष्ट होईल. मात्र सध्या या मोर्चाचा थेट फटका सुन्नी दावते इस्लामीला बसला आहे.  सुन्नी दावते इस्लामीतर्फे आझाद मैदानात १६, १७ व १८ डिसेंबर या तीन दिवसांमध्ये सुन्नी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुन्नी इज्तेमाचे हे ३० वे वर्ष आहे. या इज्तेमाला मुंबई, ठाणे, नाशिक, मालेगाव, भिवंडी व राज्याच्या विविध भागा

सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? डॉ. जितेंद्र आव्हाड

सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय?  हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय- डॉ. जितेंद्र आव्हाड  लोकमानस  प्रतिनिधी-  आंतरजातीय आणि आंतरधर्मिय विवाह करण्यापूर्वी सरकारला कळवायचे; मग, सरकार मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा करणार, असे परित्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकाची चर्चा करीत असताना सदरचे परिपत्रक हे संविधान विरोधी आणि मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करणारे आहे. नशीब अजून सरकार हे सांगत नाही की आम्ही कुंडल्या जमवून बघू आणि मग त्यानंतर होकार किंवा नकार कळवू. हे सरकार आहे कि विवाह नोंदणी कार्यालय? असा सवाल करीत हे सरकार वर्ण-वर्ग व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.  आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहांची माहिती आधी सरकारला कळवायची; त्यानंतर सरकारी पॅनल मुलांच्या पालकांशी चर्चा करेल, अशा आशयाचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयावर डॉ आव्हाड यांनी  टीका केली.  डॉ. आव्हाड म्हणाले की,  या सरकारला वेड लागले आहे, असे मला वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास ज्यांना माहित आहे. त्यांना हे माहित अस

मुंब्रा येथील दाऊदी बोहरा समाजाच्या विनामूल्य वैदयकीय तपासणी शिबिरात २०० जणांची तपासणी

इमेज
मुंब्रा येथील दाऊदी बोहरा समाजाच्या  विनामूल्य वैदयकीय तपासणी शिबिरात २०० जणांची तपासणी उमूर सहिया संघटना  व फोर्टिस रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन   लोकमानस प्रतिनिधी मुंब्रा दाऊदी बोहरा समाजातर्फे मुंब्रा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उमूर सहिया संघटना व फोर्टिस रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंब्रा आनंद कोळीवाडा येथील बोहरा मशीद परिसरात हे शिबिर संपन्न झाले. सुमारे २०० पेक्षा अधिक गरजूंची यावेळी तपासणी करण्यात आली.   फाऊंडेशनचे अध्यक्ष मुर्तुजा बेग यांनी सांगितले, या भागातील गरीब व गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड शुगर तपासणी, ब्लड प्रेशर, ईसीजी, डोळे तपासणी, ह्रद्य विकार अशा विविध रोगांची यावेळी तपासणी करण्यात आली. फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. नेहा सिंग यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी केली. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्यापैकी काही जणांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याचे समो

एनकेजीएसबी बँक दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

इमेज
एनकेजीएसबी बँक दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  एनकेजीएसबी बँकेच्या दिंडोशी शाखेचा वर्धापन दिन  नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला .  लायन व प्रसिध्द उद्योगपती रमेश कसबेकर, म्हाळसा एन्टरटेन्मेंटचे संचालक सुरेश पै, सहकार क्षेत्रातील १०५ वर्षांच्या एनकेजीएसबी बँकेचे उपाध्यक्ष किरण कामथ, तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी विशाल राठोड, अमित जावकर यांच्या शुभहस्ते दिंडोशी शाखेच्या २९व्या वर्धापदिनानिमित्त दीप प्रज्वलन झाले. या निमित्ताने २५० भागधारक, ग्राहकांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.

माजी खासदार मजीद मेमन यांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

इमेज
माजी खासदार मजीद मेमन यांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  विख्यात कायदेतज्ञ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांनी आज नवी दिल्लीत तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डेरेक ओ ब्रायन व सौगता रॉय यावेळी उपस्थित होते.   मेमन २०१४ ते २०२० या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. संसदेच्या विविध महत्त्वपूर्ण संसदीय समित्यांवर काम केले आहे. मेमन यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मेमन यांना कायदे क्षेत्रातला तब्बल ४९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक मोठे खटले त्यांनी चालवले असून विविध प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तीवाद केला आहे. देशातील विविध उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, तसेच विदेशातील अनेक न्यायालयांमध्ये मेमन यांनी युक्तीवाद केला आहे.

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - गृहखात्याने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सोमवारी रात्री याबाबत आदेश काढण्यात आले.  पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुप्ता यांची अपर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था या पदावर नियुक्त करण्यात आले. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी मिलींद भारंबे, पिंपरी चिंचवड च्या आयुक्तपदी विनयकुमार चौबे, मीरा भाईंदर वसई विरारच्या आयुक्तपदी मधुकर पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  मुंबईतील पाचही सह पोलिस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सह आयुक्त-कायदा व सुव्यवस्था पदी सत्यनारायण चौधरी, सह आयुक्त- आर्थिक गुन्हे पदी निशित मिश्रा, सह आयुक्त- वाहतूक पदी प्रवीण पडवळ, सह आयुक्त- गुन्हे पदी लखमी गौतम यांची तर सह आयुक्त प्रशासन या पदी एस. जयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रशांत बुरडे यांची अपर पोलिस महासंचालक- गुन्हे अन्वेषण विभाग पदी, सदानंद दाते यांची अपर पोल

एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे

इमेज
एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  एनकेजीएसबी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी सुनील पानसे यांची नियुक्ती करण्यात आली.  पानसे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.  अथक परिश्रम आणि एकजुटीचा बळावर आपण सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd )  बँकेचे नाव सहकारी क्षेत्रामध्ये फडकवत ठेवायचे आहे . ग्राहकांनी  डोळे मिटून व्यवहार करावा ही आपल्या बँकेची घोषणा असून त्या प्रमाणे ग्राहकांना आपण चांगली सेवा देत आहोत ह्याचा मला अभिमान वाटत आहे असे उद्गार नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd ) बँकेचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक सुनील पानसे यांनी काढले.   पानसे यांची नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण ( Nkgsb Co Operative Bank Ltd ) बँकेचे नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाल्याने बँकेच्या कर्मचारयांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल  पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिल्या.  

समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ह्रास होणे चिंताजनक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

इमेज
समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ह्रास होणे चिंताजनक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लोकमानस प्रतिनिधी मुंबई - एकीकडे समाज सुशिक्षित होत आहे, शिक्षणाचा स्तर वाढत आहे. मात्र दुसरीकडे मानवी मूल्यांचा ह्रास होत आहे. हा मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांना महत्व दिले गेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.     राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले.कार्यक्रमाला आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) कमलकिशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे व एम ए सईद, आयोगाचे सदस्य सचिव रवींद्र शिसवे तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते. भारतामध्ये नारी शक्तीला देवीचे स्थान दिले आहे. परंतु आज संस्कारांच्या अभावी महिलांशी दुर्व्यवहार केला जातो हे खेदजनक आहे. महिला व मुलांवर संकट आले असताना लोक मदतीला धावण्याचे

गुजरात मध्ये भाजपचा विक्रमी विजय, हिमाचलमध्ये भाजपला पराभवाचा धक्का, कॉंग्रेसचा विजय

  गुजरात मध्ये भाजपचा विक्रमी विजय, हिमाचलमध्ये भाजपला पराभवाचा धक्का, कॉंग्रेसचा विजय  लोकमानस प्रतिनिधी मुंबई – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. २००२ चा आपलाच विक्रम मोडत भाजपने तब्बल जागांवर विजय मिळवला आहे. तर, हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे . गुजरातमध्ये भाजपने १५० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. हा आजपर्यंतचा विक्रम आहे. १९८५ मध्ये कॉंग्रेसने १४९ जागा जिंकल्या होत्या तो विक्रम आजपर्यंत अबाधित होता. आता तो विक्रम मोडीत निघाला आहे. कॉंग्रेसचे गुजरातचे प्रभारी रघु शर्मा यांनी पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे.   हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. ६८ सदस्यीस विधानसभेत कॉंग्रेसचे २० उमेदवार विजयी झाले आहेत तर १९ जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजपला १३ जागांवर विजय मिळाला असून १३ जागांवर पक्ष आघाडीवर आहे.

मुंबई पोर्टच्या विकासात गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत - नरेंद्र वाबळे

इमेज
  मुंबई पोर्टच्या विकासात गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत -   नरेंद्र वाबळे लोकमानस प्रतिनिधी मुंबई -   मुंबई शहरात मुंबई पोर्ट हे लँड लॉर्ड   पोर्ट असून , पोर्टमधील या जमिनीचा विकास करताना गोदी कामगारांना आपल्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत , तसेच पोर्ट ट्रस्टच्या भूखंडावरील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी संबंधित रहिवाशांना मिळाली पाहिजे ,  अशी मागणी   मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रकाशन सोहळ्यात केली .   मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये   ज्येष्ठ कामगार नेते ॲड .   एस . के . शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली " पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक " २०२२ चे प्रकाशन नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते झाले .   याप्रसंगी   ते म्हणाले की ,  घरांच्या लढ्यासाठी आमचा आपणास सदैव पाठिंबा राहील . मुंबई पोर्टच्या अध्यक्षांना मी लवकरच भेटणार आहे , त्यावेळेस आप