उन्नती वैरागीला सिकई मार्शल आर्ट च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

उन्नती वैरागीला सिकई मार्शल आर्ट च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक

मुंब्रा – प्रतिनिधी

उन्नती दिपक वैरागी हिला राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे. १७ वर्षांखालील मुली या गटात तिला हे यश मिळाले आहे.

ठाणे महानगर पालिका क्षेत्रातून राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी उन्नती ही एकटी मुलगी ठरली आहे. उन्नतीचे वडील दिपक नंदकिशोर वैरागी हे ठाणे पोलिस दला मध्ये नोकरीस आहेत. उन्नतीचे कराटे चे प्रशिक्षक संतोष भोर तसेच सौरव सर  यांचे उन्नतीला उत्तम मार्गदर्शन मिळाले.

 

 

 ठाणे पोलिस स्कूल मध्ये ९ वी मध्ये शिकत असलेली १५ वर्षीय उन्नती वयाच्या पाचव्या वर्षा पासून कराटे चे प्रशिक्षण घेत आहे. तिचे ब्लॅक बेल्ट डॅन पर्यंतचे प्रशिक्षण झाले आहे. सिकई मार्शल आर्टचे प्रशिक्षण ती गेल्या ३ महिन्यांपासून घेत आहे. फिट राहण्यासाठी ती पहाटे साडेचार वाजता उठून स्किपींग करुन स्ट्रेचिंगचा सराव करते.

 

१४ डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत उन्नतीने सुवर्ण पदक पटकावत विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. १९ डिसेंबरला झालेल्या विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत तिने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला व राज्यस्तरीय स्पर्धेत तिने रौप्य पदक मिळवले.

२२ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान मीरा भाईंदर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उन्नतीला हे यश मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उन्नतीला यापूर्वी कराटे मध्ये विविध स्पर्धांत अनेक बक्षिसे मिळाली आहेत. 

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही