मुंब्रा येथील दाऊदी बोहरा समाजाच्या विनामूल्य वैदयकीय तपासणी शिबिरात २०० जणांची तपासणी

मुंब्रा येथील दाऊदी बोहरा समाजाच्या विनामूल्य वैदयकीय तपासणी शिबिरात २०० जणांची तपासणी

उमूर सहिया संघटना व फोर्टिस रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन 

लोकमानस प्रतिनिधी

मुंब्रा

दाऊदी बोहरा समाजातर्फे मुंब्रा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उमूर सहिया संघटना व फोर्टिस रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंब्रा आनंद कोळीवाडा येथील बोहरा मशीद परिसरात हे शिबिर संपन्न झाले. सुमारे २०० पेक्षा अधिक गरजूंची यावेळी तपासणी करण्यात आली.


 फाऊंडेशनचे अध्यक्ष मुर्तुजा बेग यांनी सांगितले, या भागातील गरीब व गरजूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड शुगर तपासणी, ब्लड प्रेशर, ईसीजी, डोळे तपासणी, ह्रद्य विकार अशा विविध रोगांची यावेळी तपासणी करण्यात आली. फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. नेहा सिंग यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी केली. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्यापैकी काही जणांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याचे समोर आले.

४० जणांची डोळे तपासणी झाली. त्यापैकी अनेकांची नजर कमी झाल्याचे स्पष्ट झाले त्यांना टीव्ही, संगणकासमोर जास्त वेळ न बसण्याचा सल्ला देण्यात आला.दाऊदी बोहरा समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमिल शेख गुलाम अब्बास इंदोरवाला म्हणाले, उमूर सेहियाने या शिबिराचे आयोजन करुन नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध करुन दिली आहे. छाया पुंडलिक म्हणाल्या, संस्था सर्व समाजाच्या नागरिकांसाठी चांगले काम करत आहे. विविध तपासणीसाठी नागरिकांना खर्च करावा लागतो व रुग्णालयात जावे लागते मात्र याठिकाणी ही सुविधा एकाच ठिकाणी व विनामूल्य उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. सुमित्रा मागाडे यांनी अशा प्रकारची शिबिरे सातत्याने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. वैद्यकीय शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. सकिना बादलावाला, डॉ. कुतुब पूरी यांच्यासहित मुर्तुजा बेगूवाला,जोएब सोनी, मुर्तुजा पोलाई,इब्राहिम जूज़र सोनी व फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही