माजी खासदार मजीद मेमन यांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

माजी खासदार मजीद मेमन यांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 

विख्यात कायदेतज्ञ व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांनी आज नवी दिल्लीत तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डेरेक ओ ब्रायन व सौगता रॉय यावेळी उपस्थित होते.  

मेमन २०१४ ते २०२० या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. संसदेच्या विविध महत्त्वपूर्ण संसदीय समित्यांवर काम केले आहे.

मेमन यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मेमन यांना कायदे क्षेत्रातला तब्बल ४९ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक मोठे खटले त्यांनी चालवले असून विविध प्रकरणांमध्ये त्यांनी युक्तीवाद केला आहे. देशातील विविध उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, तसेच विदेशातील अनेक न्यायालयांमध्ये मेमन यांनी युक्तीवाद केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही