गुजरात मध्ये भाजपचा विक्रमी विजय, हिमाचलमध्ये भाजपला पराभवाचा धक्का, कॉंग्रेसचा विजय

 

गुजरात मध्ये भाजपचा विक्रमी विजय, हिमाचलमध्ये भाजपला पराभवाचा धक्का, कॉंग्रेसचा विजय 

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने विक्रमी विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. २००२ चा आपलाच विक्रम मोडत भाजपने तब्बल जागांवर विजय मिळवला आहे. तर, हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे.

गुजरातमध्ये भाजपने १५० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. हा आजपर्यंतचा विक्रम आहे. १९८५ मध्ये कॉंग्रेसने १४९ जागा जिंकल्या होत्या तो विक्रम आजपर्यंत अबाधित होता. आता तो विक्रम मोडीत निघाला आहे.

कॉंग्रेसचे गुजरातचे प्रभारी रघु शर्मा यांनी पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पाठवला आहे.

 हिमाचल प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. ६८ सदस्यीस विधानसभेत कॉंग्रेसचे २० उमेदवार विजयी झाले आहेत तर १९ जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. भाजपला १३ जागांवर विजय मिळाला असून १३ जागांवर पक्ष आघाडीवर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही