देवगड मध्ये 8 जानेवारीला सुन्नी इज्तेमाचे आयोजन, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

देवगड मध्ये 8 जानेवारीला सुन्नी इज्तेमाचे आयोजन,  महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था 
प्रतिनिधी 
देवगड मध्ये 8 जानेवारी रोजी एक दिवसीय सुन्नी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच देवगड येथे सुन्नी दावते इस्लामीचा एक दिवसीय तरबियाती इज्तेमा
8 जानेवारीला होत आहे. 
सुन्नी दावते इस्लामीचे प्रमुख मोहम्मद शाकीर नूरी,  सुन्नी दावते इस्लामी, मालेगावचे सय्यद अमीनुल कादरी निग्रान, कारी मोहम्मद रिझवान खान या इज्तेमामध्ये मार्गदर्शन करतील. 
दुपारी ३ पासून महिला वर्गासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 
रविवार  8 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा इज्तेमा चालेल.  
देवगड मधील डायमंड हॉटेलच्या मागे इंद्र प्रसाद हॉल येथे हा इज्तेमाचा कार्यक्रम होईल. 
सर्व मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे असे आवाहन सुन्नी दावते इस्लामी, देवगड कमिटी यांनी केले आहे. 
अधिक माहितीसाठी  9921859594, 9819846678, 9137683903 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही