राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

 राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमानस प्रतिनिधी 

मुंबई - गृहखात्याने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सोमवारी रात्री याबाबत आदेश काढण्यात आले. 

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुप्ता यांची अपर पोलिस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था या पदावर नियुक्त करण्यात आले. नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी मिलींद भारंबे, पिंपरी चिंचवड च्या आयुक्तपदी विनयकुमार चौबे, मीरा भाईंदर वसई विरारच्या आयुक्तपदी मधुकर पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबईतील पाचही सह पोलिस आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सह आयुक्त-कायदा व सुव्यवस्था पदी सत्यनारायण चौधरी, सह आयुक्त- आर्थिक गुन्हे पदी निशित मिश्रा, सह आयुक्त- वाहतूक पदी प्रवीण पडवळ, सह आयुक्त- गुन्हे पदी लखमी गौतम यांची तर सह आयुक्त प्रशासन या पदी एस. जयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रशांत बुरडे यांची अपर पोलिस महासंचालक- गुन्हे अन्वेषण विभाग पदी, सदानंद दाते यांची अपर पोलिस महासंचालक- दहशतवाद विरोधी पथक पदी, विश्वास नांगरे पाटील यांची अपर पोलिस महासंचालक - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पदी, राज वर्धन यांची अपर पोलिस महासंचालक- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ पदी, अमिताभ गुप्ता यांची अपर पोलिस महासंचालक- कायदा व सुव्यवस्था पदी, निकेत कौशिक यांची अपर पोलिस महासंचालक- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पदी, शिरीष जैन यांची सह आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग पदी, संजय मोहिते यांची विशेष पोलिस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

अमरावती शहर पोलिस आयुक्त पदी नवीनचंद्र रेड्डी, नाशिकच्या पोलिस आयुक्त पदी अंकुश शिंदे, कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी प्रवीण पवार, नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी,

सशस्त्र पोलिसांच्या अपर पोलिस आयुक्त पदी आरती सिंह, गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस उप महानिरीक्षक पदी नामदेव चव्हाण यांची, मुंबई वाहतूक विभागाच्या अपर पोलिस आयुक्त पदी निसार तांबोळी यांची, मुंबई गुन्हे विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची तर विशेष शाखा मुंबईच्या अपर पोलिस आयुक्त पदी रंजन कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नाशिकच्या पोलिस आयुक्त पदी अंकुश शिंदे, कोकणच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी प्रवीण पवार, नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदी सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. 

मुंबईतील मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्त पदी अनिल कुंभारे, पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तपदी परमजीत दहिया, पूर्व प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्त पदी विनायक देशमुख व उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर पोलिस आयुक्तपदी राजीव जैन यांना नियुक्ती देण्यात आली आहे. 

विनीत अगरवाल, बिपीन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार, महेश पाटील, सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी.जी.शेखर, संजय दराडे, विरेंद्र मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही