जमात ए इस्लामी तर्फे रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

 

जमात ए इस्लामी तर्फे रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी

जमात ए इस्लामी तर्फे कौसा येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये रिफॉर्मेशन कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. शुक्रवारी शालेय गटातील स्पर्धेला प्रारंभ झाला.

शालेय गटात १६ संघ व वरिष्ठ गटात १६ गट अशा एकूण ३२ संघांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होईल.  

 

शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस ही स्पर्धा होईल. शालेय गटातील विजेत्या संघाला पाच हजार रुपये व उप विजेत्या संघाला तीन हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. तर, वरिष्ठ गटातील विजेत्या संघाला तीस हजार रुपये व उप विजेत्या संघाला वीस हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

जमात ए इस्लामी हिंदतर्फे या स्पर्धेचे गेल्या अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येते. खेळांच्या माध्यमातून समाजातील तरुणाईला विधायक मार्गाकडे वळवण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईटस (एपीसीआर) चे सचिव अस्लम गाझी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण केले जाईल.

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही