पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

  राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रतिनिधी मुंबई- राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नवी मुंबईचे महापालिका आयुरक्त अभिजीत बांगर यांची बदली ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे. लीना बनसोड यांची आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, विवेक जॉन्सन यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, अभिजीत राऊत यांची नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी, डॉ. रामास्वामी एन यांची कौशल्य विकास विभागाच्या आयुक्तपदी, डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदी, जयश्री भोज यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदी, परिमल सिंग यांची नानाजी देशमुख कृषी संजिवनी   प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी, ए.आर.काळे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी, नीलेश गटने यांची पुणे एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, सौरभ विजय यांची

रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागूरिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल कॅब सात रुपये भाडेवाढ

रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागू रिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल  कॅब सात रुपये भाडेवाढ प्रतिनिधी  मुंबई-   मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा, काळी पिवळी टॅक्सी व कुल कॅब टॅक्सीची भाडेवाढ 1 ऑक्टोबर पासून लागू होईल. रिक्षा दोन रुपये, टॅक्सी तीन रुपये व कुल कॅबची सात रुपये भाडेवाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्रवाशांना सेवा देणाऱ्या रिक्षा व टॅक्सी यांचे दर हे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामार्फत निश्चित केले जातात. प्राधिकरणामार्फत रिक्षा, टॅक्सी व कुल  कॅबचे सध्याचे दर 1 मार्च 2021 रोजी लागू करण्यात आले होते, परंतु गतवर्षाच्या तुलनेत चालू वर्षात सीएनजी इंधनाच्या दरात वाढ झालेली असून इंधनाचे दर प्रतिकिलो  49.40 रुपयांवरुन  80 रुपये झालेले आहे. खटुआ समितीच्या शिफारशींच्या आधारे, सध्याचा महागाई निर्देशांक व वाढलेले इंधनाचे दर इतर संबंधित बाबी विचारात घेऊन त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक/मालक व त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हितास प्राधान्य देऊन प्राधिकरणाने 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध

हाजी अरफात शेख यांनी घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांची भेट

इमेज
हाजी अरफात शेख यांनी घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालक  प्रविण साळुंके यांची भेट लोकमानस प्रतिनिधी मुंबई - राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजपच्या ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रमुख हाजी अरफात शेख यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक  प्रविण साळुंके यांची भेट घेतली.  एक्सप्रेस वर होणाऱ्या अपघातानंतर बऱ्याच वेळा सदर ठिकाणी कोणतीही अत्यावश्यक सेवा उपलब्ध न झाल्याने लूटमारीचे प्रकार घडतात त्यामूळे कडक पेट्रोलिंग (गस्त) वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे लुटमार थांबेल व तातडीने मदत मिळण्यास सोपे होईल, याकडे शेख यांचे लक्ष वेधले.  महाराष्ट्रात मंडीच्या दिवशी वारंवार होणारी लूटपाट, बकरे व पैसे लुटने या सारखे प्रकार अनेक दिवसांपासुन चालू आहेत याला कुठे तरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी मंडीच्या दिवशी त्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी शेख यांनी केली. याशिवाय अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाली त्यावर साळुंके यांनी सकारात्मक विश्वास दर्शवला, अशी माहिती हाजी अरफात शेख यांनी दिली.

चिपी विमानतळाला बँ. नाथ पै यांचे नाव

चिपी विमानतळाला बँ. नाथ पै यांचे नाव, मंत्रिमंडळाचा निर्णय लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला  माजी खासदार बँ. नाथ पै यांचे नाव देण्याचा निर्णय    राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. ९ ऑक्टोबर २०२१ ला  चिपी विमानतळाचे लोकार्पण  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते. 

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील जीटी ट्रॅव्हल्सची बाजी

इमेज
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील जीटी ट्रॅव्हल्सची बाजी लोकमानस प्रतिनिधी   - भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे देण्यात येणारा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळा आज जागतिक पर्यटन दिनी दिल्ली येथील विज्ञानभवन सभागृहात पार पडला. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते विविध वर्गवारीतील विजेत्यांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.  राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१८-१९ या पुरस्कारासाठी संपुर्ण देशभरातील विविध राज्यांमधून नामांकने दाखल झाली असताना महाराष्ट्रातील मुंबईस्थित जीटी ट्रॅव्हल्स प्रा.लि. या कंपनीने यात बाजी मारून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कंपनीने राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार-पर्यटक परिवहन प्रचालक (श्रेणी २) वर्गवारीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून कंपनीचे संचालक तसेच शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी हा पुरस्कार केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते स्वीकारला.  याप्रसंगी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग ,अतिरिक्त सचिव राकेशकुमार वर्मा आणि इतर अ

शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी

  शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला परवानगी लोकमानस प्रतिनिधी मुंबई खरी शिवसेना व धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह कुणाचे या सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या प्रकरणात उध्दव ठाकरे यांच्या गटाला धक्का बसला असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. शिवसेना व धनुष्य बाण या चिन्हावरील दाव्याचा निर्णय घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्याची ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.        मंगळवारी दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे शिवसेना व पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. पक्ष कुणाची जहागिरदारी नाही व ८० टक्के पक्ष नेते, कार्यकर्ते पदाधिकारी आमच्यासोबत आहेत. निवडणूक आयोगात सत्याचाच विजय होईल, असे म्हस्के म्हणाले.   तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची बाजू मांडू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रेम, बंधूभाव व शांततेचा संदेश देण्यासाठी सर्वांसाठी प्रेषित उपक्रमाचे आयोजन

इमेज
प्रेम, बंधूभाव व शांततेचा संदेश देण्यासाठी सर्वांसाठी प्रेषित उपक्रमाचे आयोजन खलील गिरकर – मुंबई इस्लाम आणि इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गैर मुस्लिम समाजामध्ये इस्लाम व प्रेषित मोहम्मद यांचा प्रेम, शांतता व बंधूभावाचा संदेश अधिकाधिक प्रमाणात पोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इस्लाम व प्रेषित मोहम्मद  यांच्याबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी या उपक्रमाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास या उपक्रमाचे निमंत्रक व इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार अँड युसूफ अब्राहणी व्यक्त केला. अब्राहणी पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनलचे अध्यक्ष अमीर इद्रिसी व सईद खान उपस्थित होते. ९ ऑक्टोबरला असलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अल्पसंख्याक संस्थांतर्फे चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील सुमारे ५०० नोंदणीकृत मशीदी, सुमारे ४०० शाळा व २० महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्य

पालकमंत्र्यांची यादी जाहीर

पालकमंत्र्यांची यादी जाहीर मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे  नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे: राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार, गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव दादा भुसे- नाशिक, संजय राठोड- यवतमाळ, वाशिम सुरेश खाडे- सांगली, संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव) रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, अतुल सावे - जालना, बीड, शंभूराज देसाई - सातारा, ठाणे, मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

सौदी अरेबियाचा राष्ट्रीय दिवस मुंबईत उत्साहात साजरा

इमेज
  सौदी अरेबियाचा राष्ट्रीय दिवस मुंबईत उत्साहात साजरा मुंबई सौदी अरेबियाचा ९२ वा राष्ट्रीय दिवस मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौदी अरेबियाचे मुंबईतील वाणिज्यदूत, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. सौदी अरेबिया व भारताच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी बांग्लादेशचे उप उच्चायुक्त चिरंजीव सरकार, अफगाणिस्तानच्या वाणिज्यदूत जाकिया वर्दक, दक्षिण आफ्रिकेचे उप वाणिज्यदूत  (प्रशासन) इसाक नडाला, मलेशियाचे उप वाणिज्यदूत मोहम्मद स्यॅरकावी, गायक अदनान सामी, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, आमदार जीशान सिद्दीकी, आमदार अमीन पटेल, आमदार अबू आसिम आझमी, आमदार रईस शेख, अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी, कोकण बॅंकेचे संचालक बशीर मुर्तुझा, संचालिका तस्नीम काझी, डॉ समी बुबेरे, नबी अख्तर कुरैशी, यासहित मोठ्या संख्येने विविध देशांचे वाणिज्यदूत, उप वाणिज्यदूत, अधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ, निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार, टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन बनवणार

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ ,  निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार ,  टोल फ्री क्रमांक , मोबाईल ॲप्लिकेशन बनवणार लोकमानस प्रतिनिधी    मुंबई - राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज सादर करता यावेत यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार या कक्षाचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे.   मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख   मंगेश चिवटे उपस्थित होते. या बैठकीत खारगे यांनी कक्षाच्या कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या. निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बैठकीत सांगितले की , ऑनलाईन एप्लिकेशन तसेच वेबसाईट द्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपल

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास शिवसेनेला उच्च न्यायालयाची परवानगी

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास शिवसेनेला उच्च न्यायालयाची परवानगी न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यास शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मुंबई महापालिकेने अधिकाराचा गैरवापर केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.  शिवसेनेतर्फे अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या निकालाचे स्वागत केले. 1966 पासून चालत आलेल्या या प्रथेसाठी उत्साहात, वाजत गाजत व शिस्तीत या मात्र कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

नवरात्री उत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज

नवरात्री उत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज   लोकमानस प्रतिनिधी  मुंबई-  देश विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरमध्ये नवरात्री उत्सवाची तयारी जोरदार सुरू असून नवरात्रीच्या दर दिवशी साधारणतः लाखो भाविक दर्शनासाठी येतात. ललिता पंचमी , अष्टमी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची संख्या तीन लाखांपर्यंत जाते . वयस्कर , अपंग , गर्भवती स्त्रियांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था केली आहे . तसेच व्हीआयपी  पास होल्डर या सर्वांना सुरक्षा रक्षक व्यवस्थेतून जावे लागणार आहे . भाविकांच्या सुरक्षेचा दृष्टीने सर्व प्रकारची तयारी मंदिर व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाने केली आहे असे महालक्ष्मी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये यांनी सांगितले .  महालक्ष्मी शारदीय नवरात्रौत्सव सोमवारी २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत असून मंदिरामध्ये सूर्योदयापूर्वी सकाळी ५.३० वाजता घटस्थापना होवून त्या नंतर ध्वजारोहण सकाळी ६.३० वाजता व आरती सकाळी ७.०० वाजता होईल . शुक्रवारी ३० सप्टेंबर २०२२ रोजी ललितापंचमी पूजन आहे . सोमवारी  ३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध अष्टमी असून अष्टमी ह

वक्फ बोर्डाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात हाजी अरफात शेख आक्रमक, अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इमेज
   वक्फ   बोर्डाच्या   भ्रष्ट   अधिकाऱ्यांविरोधात हाजी अरफात शेख आक्रमक, अधिकाऱ्यांच्या   सखोल   चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सरकारची दिशाभूल करणाऱ्या जयश्री मुखर्जी यांच्यावर कारवाईची मागणी बेकायदा नेमणूक रोखली लोकमानस प्रतिनिधी मुंबई -    महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे भ्रष्ट व वादग्रस्त अधिकारी अनीस शेख व फारुख प़ठाण यांची बेकायदा होत असलेली नेमणूक त्वरित थांबवावी व सरकारची दिशाभूल करणाऱ्या सनदी अधिकारी जयश्री मुखर्जी यांच्यावर कडक कारवाई करुन अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष, भाजपच्या वाहतूक विभागाचे प्रमुख हाजी अरफात शेख आक्रमक झाले आहेत. याबाबत, हाजी अरफात शेख यांनी भोपाळ दौऱ्यावरुन थेट दिल्ली गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली व कारवाईची मागणी केली. शेख यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शेख व पठाण यांची नेमणूक रोखल्याची माहिती हाजी अरफात यांनी दिली.   महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री असताना मुखर्जी यांनी

रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

इमेज
रेल्वे प्रवाशांच्या  समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट मुंबई -  ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा मधील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांची माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली परिवहन समिती सदस्य प्रकाश पाटील, माजी नगरसेविका आशरिन राऊत, रेहान खान, इम्रान सुर्मे, संगिता पालेकर, शोएब खान, बबलू शेमना,  गुड्डु खालू यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली.  या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये कळवा आणि मुंब्र्यामध्ये 27 नॉन एसी गाड्यांचा स्टॉप काढून टाकला आहे आणि 12 एसी गाड्यांचा स्टॉप वाढवला आहे, तो रद्द करुन त्याबाबत पुन्हा विचार करुन कार्यवाही करावी अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली.   कळव्याच्या कारशेडमध्ये  प्लॅटफॉर्म तयार करावा त्यामुळे तेथून कळवेकरांना सोप्या पद्धतीने गाडीत चढता येईल. त्याचबरोबर कळवा, मुंब्रा व दिवा भागामधील लोकसंख्येमध्ये मागिल 20 वर्षांमध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे. मुंबईला प

संभाजीनगरमधील ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच शिवसेनेत दाखल

इमेज
संभाजीनगरमधील ५० गावातील ग्रामपंचायत  सदस्य व सरपंच शिवसेनेत दाखल प्रतिनिधीक स्वरूपात अनेकांनी हाती घेतले शिवबंधन मुंबई - संभाजीनगरमधील वैजापूरच्या ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे येत्या काही दिवसांत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज माजी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विजय राव साळवे , संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.    आज शिवसेनेत पक्षप्रवेश घेतलेल्या संभाजीनगर पश्चिम व वैजापूर मधील सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. निवडणुका केव्हाही जाहीर होतील. पुढच्या निवडणुकीत शिवरायांचा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे शिवसेना बळकटीकरणासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना केले.       वैजापूरमधील जितेंद्र पाटील जगदाळे,सरपंच जानेफळ,  विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष  कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील

अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांची भेट व चर्चा

इमेज
  अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर हाजी अरफात शेख यांची मुख्यमंत्र्यांची भेट व चर्चा लोकमानस प्रतिनिधी मुंबई – राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीत भेट घेतली व चर्चा केली.  अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देऊ असा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती हाजी अरफात शेख यांनी दिली.

मुंबई पोर्ट प्राधिकरण अधिकारी पदासाठी कामगार संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग

इमेज
  मुंबई पोर्ट प्राधिकरण अधिकारी पदासाठी कामगार संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग लोकमानस प्रतिनिधी मुंबई - पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील चार असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजरच्या जागेसाठी २५ कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे   माझगाव येथील कामगार सदन सभागृहामध्ये १९ सप्टेंबर पासून   ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात १९ सप्टेंबर रोजी   गोदी विभागाचे सिनियर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर   ए. बी. झरकर ,  २० सप्टेंबर रोजी     मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपसचिव   सिद्धसंजय आफळे , सेवानिवृत्त सिनियर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ए. बी. इथापे यांनी मार्गदर्शन केले.   प्रशिक्षणवर्गाच्या समारोप प्रसंगी   युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज , युनियनचे सेक्रेटरी व   मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे , सेक्रेटरी   विद्याधर राणे , विजय रणदिवे ,  प्रसिध्दीप्रमुख मारुती विश्वासराव , संघटक चिटणीस   मनीष पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना

कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

इमेज
कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ   कोविंद लोकमानस प्रतिनिधी मुंबई : साधेपणा , विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ' भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन ’ हे पुस्तक होय , असे गौरवोद्गार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. राजभवन , दरबार हॉल येथे डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘ भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन ’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी , रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी उपस्थित होते. यावेळी कोविंद म्हणाले , महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संविधानिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे .कोश्यारी यांची सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल ही वाटचाल प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. संसद भवनाच्या दोन्ही सभागृहाचा कामाचा अनुभव अस