मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ, निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणार, टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन बनवणार

  

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्ज करणे होणार सुलभ

निधीच्या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवणारटोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप्लिकेशन बनवणार

लोकमानस प्रतिनिधी  

मुंबई - राज्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ अर्ज सादर करता यावेत यासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार या कक्षाचे काम जास्तीत जास्त गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार या कक्षाचे अॅप्लिकेशन आणि टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार आहे.

 

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख  मंगेश चिवटे उपस्थित होते.

या बैठकीत खारगे यांनी कक्षाच्या कामाचा आढावा घेतला आणि कामकाजाबाबत काही सूचना दिल्या.

निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बैठकीत सांगितले की, ऑनलाईन एप्लिकेशन तसेच वेबसाईट द्वारे रुग्णांचे अर्ज तत्काळ उपलब्ध होणारी यंत्रणा तयार करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे मोबाईल अॅप्लीकेशन तसेच मदत व मार्गदर्शनासाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरु करण्यात येईल.

तसेच योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व शासकीय जिल्हा रूग्णालयांचे शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठता यांनी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 

वैद्यकीय सहाय्यता निधीमधील रुग्णालयांची संख्या वाढविणार

 

राज्यातील जास्तीत जास्त रुग्णांना सहाय्यता उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांचा समावेश (पॅनल) करण्यात येणार आहेत. याकरीता रूग्णालयाने अर्ज सादर करावे यासाठी रूग्णालयांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच रुग्णांलयांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांच्या पर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचवली जाणार आहे. राज्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पोहचवा असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे  चिवटे यांनी सांगितले. 

 या बैठकीला डॉ.आनंद बंगडॉ.रागिणी पारेख, डॉ.कैलास पवार, डॉ.बी.एस.नागावकर, डॉ.मोहन जोशी अधिष्ठाता,

डॉ.संजय सुरासे, डॉ.प्रविण बांगर, डॉ.अविनाश गुटे, डॉ.अरुण राठोड

डॉ.दिनेश धोंडी, डॉ.दिलीप गवारे,डॉ.ममता जवादे

उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही