मुंबई पोर्ट प्राधिकरण अधिकारी पदासाठी कामगार संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग

 

मुंबई पोर्ट प्राधिकरण अधिकारी पदासाठी कामगार संघटनेतर्फे प्रशिक्षण वर्ग

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई - पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील चार असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजरच्या जागेसाठी २५ कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनतर्फे  माझगाव येथील कामगार सदन सभागृहामध्ये १९ सप्टेंबर पासून  ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात १९ सप्टेंबर रोजी  गोदी विभागाचे सिनियर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर  ए. बी. झरकर२० सप्टेंबर रोजी   मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे उपसचिव  सिद्धसंजय आफळे, सेवानिवृत्त सिनियर असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर ए. बी. इथापे यांनी मार्गदर्शन केले.

 

प्रशिक्षणवर्गाच्या समारोप प्रसंगी  युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी व  मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे, सेक्रेटरी  विद्याधर राणे, विजय रणदिवेप्रसिध्दीप्रमुख मारुती विश्वासराव, संघटक चिटणीस  मनीष पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शनपर  शुभेच्छा दिल्या.


  याप्रसंगी खजिनदार  विकास नलावडे, संघटक चिटणीस, बाळकृष्ण लोहोटे, उपाध्यक्ष  निसार युनूस  उपस्थित होते. प्रशिक्षणार्थीच्या वतीने  मुनाफ पठाण यांनी आभार व्यक्त केले, तर प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी दिलीप बारगुडे यांनी सहकार्य केले, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिध्दी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही