संभाजीनगरमधील ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच शिवसेनेत दाखल

संभाजीनगरमधील ५० गावातील ग्रामपंचायत  सदस्य व सरपंच शिवसेनेत दाखल
प्रतिनिधीक स्वरूपात अनेकांनी हाती घेतले शिवबंधन
मुंबई - संभाजीनगरमधील वैजापूरच्या ५० गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच हे येत्या काही दिवसांत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज माजी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विजय राव साळवे , संघर्ष सोनवणे, विक्की चावरीया व कार्यकर्त्यांनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
   आज शिवसेनेत पक्षप्रवेश घेतलेल्या संभाजीनगर पश्चिम व वैजापूर मधील सर्वांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. निवडणुका केव्हाही जाहीर होतील. पुढच्या निवडणुकीत शिवरायांचा भगवा फडकावयाचा आहे, त्यामुळे शिवसेना बळकटीकरणासाठी कामाला लागा असे मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन कार्यकर्त्यांना केले.
    
वैजापूरमधील जितेंद्र पाटील जगदाळे,सरपंच जानेफळ,  विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष 
कैलास सुरेश जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य विश्वालफ कुहिले, जानेफळ गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष जगन पाटील जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य करजगाव तान्हाजी पाटील उगले, सरपंच पेडेफळ
सोपान पाटील आहेर, सुनील पाटील मतसगर जानेफळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही