राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


प्रतिनिधी

मुंबई- राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर नवी मुंबईचे महापालिका आयुरक्त अभिजीत बांगर यांची बदली ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली आहे.

लीना बनसोड यांची आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, विवेक जॉन्सन यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, अभिजीत राऊत यांची नांदेडच्या जिल्हाधिकारी पदी, डॉ. रामास्वामी एन यांची कौशल्य विकास विभागाच्या आयुक्तपदी, डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग विभागाच्या प्रधान सचिव पदी, जयश्री भोज यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदी, परिमल सिंग यांची नानाजी देशमुख कृषी संजिवनी  प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी, ए.आर.काळे यांची अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी, नीलेश गटने यांची पुणे एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, सौरभ विजय यांची सांस्कृतिक व पर्यटन विभागाच्या सचिव पदी, मिलींद बोरीकर यांची म्हाडा मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, अविनाश ढाकणे यांची फिल्म स्टेज व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी, संजय खंदारे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदी, डॉ.अनबलगन पी यांची महानिर्मिती च्या अध्यक्ष  व व्यवस्थापकीय संचालकपदी, दीपक कपूर यांची अतिरिक्त मुख्य सचिव जलसंधारण विभाग, वल्सा नायर सिंह याची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवपदी, मनिषा पाटणकर म्हैसकर यांची प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारीपदी, मिलींद म्हैसकर यांची प्रधान सचिव हवाई वाहतूक, सामान्य प्रशासन विभागपदी, प्रवीण दराडे यांची पर्यावरण विभागाच्या सचिवपदी, तुकाराम मुंडे यांची एनएचएमच्या आयुक्तपदी,  अनुप कुमार यादव यांची अल्पसंख्याक विभागाच्या सचिव पदी, प्रदीप कुमार व्यास यांची अतिरिक्त मुख्य सचिव आदिवासी विकास विभाग पदी, डॉ अश्विनी जोशी यांची वैद्यकीय शिक्षण व औषध प्रशासनाच्या सचिव पदी, दीपेंद्र कुशवाहा यांची विकास आयुक्तपदी, अशोक शिंगारे यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारी पदी, श्रध्दा जोशी यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, मनुज जिंदाल यांची ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, सचिन ओंबासे यांची उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदी, अमन मित्तल यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी, राजेश पाटील यांची सैनिक कल्याण विभागाच्या संचालक पदी, अशिमा मित्तल यांची नाशिक जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, कीर्ती पुजार यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, रोहन घुगे यांची वर्धा जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, विकास मीना यांची औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, वर्षा मीना यांची जालना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी, के.व्ही.जाधव यांची महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी, कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे कृषी उद्योग व ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी, राजेंद्र निंबाळकर यांची एमएसएसआयडीसी च्या व्यवस्थापकीय संचालकपदी, विवेक भीमनवार यांची परिवहन आयुक्तपदी, डॉ भगवंतराव पाटील यांची नांदेड वाघाळा महापालिका आयुक्तपदी, एम. देवेंद्र सिंग यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही