दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास शिवसेनेला उच्च न्यायालयाची परवानगी

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास शिवसेनेला उच्च न्यायालयाची परवानगी
न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यास शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गट या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मुंबई महापालिकेने अधिकाराचा गैरवापर केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 
शिवसेनेतर्फे अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडली.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या निकालाचे स्वागत केले. 1966 पासून चालत आलेल्या या प्रथेसाठी उत्साहात, वाजत गाजत व शिस्तीत या मात्र कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही