रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

रेल्वे प्रवाशांच्या  समस्या सोडवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
मुंबई - 

ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा मधील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांची माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली परिवहन समिती सदस्य प्रकाश पाटील, माजी नगरसेविका आशरिन राऊत, रेहान खान, इम्रान सुर्मे, संगिता पालेकर, शोएब खान, बबलू शेमना,  गुड्डु खालू यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली.

 या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये कळवा आणि मुंब्र्यामध्ये 27 नॉन एसी गाड्यांचा स्टॉप काढून टाकला आहे आणि 12 एसी गाड्यांचा स्टॉप वाढवला आहे, तो रद्द करुन त्याबाबत पुन्हा विचार करुन कार्यवाही करावी अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. 
 कळव्याच्या कारशेडमध्ये  प्लॅटफॉर्म तयार करावा त्यामुळे तेथून कळवेकरांना सोप्या पद्धतीने गाडीत चढता येईल. त्याचबरोबर कळवा, मुंब्रा व दिवा भागामधील लोकसंख्येमध्ये मागिल 20 वर्षांमध्ये सर्वात जास्त वाढ झाली आहे. मुंबईला प्रवास करणा-यांची जास्तीत जास्त संख्या या भागातील लोकांचीच आहे. अंदाजे कळवा, मुंब्रा, दिव्यामधून दिवसाकाठी 4 ते 5 लाख लोक प्रवास करतात. याचा विचार करुन दिवा येथून सुरु होणारी लोकल मार्गस्थ करावी. जेणेकरुन दिवा, मुंब्रा, कळवा येथील प्रवाशांना सोप्या पद्धतीने रेल्वेचा प्रवास करता येईल. 

मुंब्रा रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट व एस्क्टेलेटर्स चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच रेतीबंदर जवळ नवीन सब वे ची निर्मिती करावी.

तसेच स्लो ट्रॅकवरुन मेल आणि एक्सप्रेस ज्या पद्धतीने धावत आहेत, त्यामुळे पारसिक नगरच्या लोकांना होणारा आवाजाचा त्रास त्यावर उपाय म्हणून ध्वनी प्रतिरोधक बसवावेत अशी देखिल मागणी केली. 

 एसी ट्रेन तर चालू ठेवा. पण, त्याचबरोबर सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि खासकरुन गर्दीच्या वेळेमध्ये एसी ट्रेन चालवू नये. ज्यामुळे साध्या लोकलला खूपच गर्दी होते व त्यातून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी   लगेचच संबंधीत अधिका-यांना कार्यवाही करण्यास सांगितल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही