राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील जीटी ट्रॅव्हल्सची बाजी


राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील जीटी ट्रॅव्हल्सची बाजी

लोकमानस प्रतिनिधी 
 - भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे देण्यात येणारा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळा आज जागतिक पर्यटन दिनी दिल्ली येथील विज्ञानभवन सभागृहात पार पडला. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते विविध वर्गवारीतील विजेत्यांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१८-१९ या पुरस्कारासाठी संपुर्ण देशभरातील विविध राज्यांमधून नामांकने दाखल झाली असताना महाराष्ट्रातील मुंबईस्थित जीटी ट्रॅव्हल्स प्रा.लि. या कंपनीने यात बाजी मारून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कंपनीने राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार-पर्यटक परिवहन प्रचालक (श्रेणी २) वर्गवारीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून कंपनीचे संचालक तसेच शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल यांनी हा पुरस्कार केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते स्वीकारला. 
याप्रसंगी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव अरविंद सिंग ,अतिरिक्त सचिव राकेशकुमार वर्मा आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे नाव पर्यटन क्षेत्रात उंचावल्याबद्दल मोहन गोयल यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही