हाजी अरफात शेख यांनी घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रविण साळुंके यांची भेट


हाजी अरफात शेख यांनी घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालक  प्रविण साळुंके यांची भेट
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई - राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजपच्या ट्रान्सपोर्ट विभागाचे प्रमुख हाजी अरफात शेख यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक  प्रविण साळुंके यांची भेट घेतली. 
एक्सप्रेस वर होणाऱ्या अपघातानंतर बऱ्याच वेळा सदर ठिकाणी कोणतीही अत्यावश्यक सेवा उपलब्ध न झाल्याने लूटमारीचे प्रकार घडतात त्यामूळे कडक पेट्रोलिंग (गस्त) वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे लुटमार थांबेल व तातडीने मदत मिळण्यास सोपे होईल, याकडे शेख यांचे लक्ष वेधले. 
महाराष्ट्रात मंडीच्या दिवशी वारंवार होणारी लूटपाट, बकरे व पैसे लुटने या सारखे प्रकार अनेक दिवसांपासुन चालू आहेत याला कुठे तरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी मंडीच्या दिवशी त्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशी मागणी शेख यांनी केली. याशिवाय अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाली त्यावर साळुंके यांनी सकारात्मक विश्वास दर्शवला, अशी माहिती हाजी अरफात शेख यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब