पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश

इमेज
लाड- पागे समितीच्या शिफारशी लागू केल्याबद्दल सफाई कामगारांकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश  लोकमानस प्रतिनिधी लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करीत सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकी हक्काचे घर व इतर प्रश्न सोडवत सुस्पष्ट आदेश जारी केल्याबद्दल आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले.  राज्यातील सफाई कामगारांना लाड पांडे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मंत्री मंडळ उपसमितीने हा निर्णय जारी केला. या ऐतिहासिक निर्णयामुळे सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना नोकरीत प्राधान्य व इतर सोयी - सूविधा मिळण्याचा मार्ग सुखकर होईल. या सर्व मागण्यांसाठी आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत असलेल्या सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला हे मोठे यश मिळाले आहे.

मुस्लिम समाजातील तरुण तरुणींसाठी 'मुघल रिश्ते'

इमेज

पश्चिम नौदल कमांडच्या फ्लँग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पदी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी

इमेज
पश्चिम नौदल कमांडच्या फ्लँग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पदी व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  आयएनएस शिक्रावर आयोजित एका दिमाखदार संचलनात व्हाईस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, एव्हीएसएम, एनएम यांनी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून पश्चिम नौदल कमांडचे (WNC) फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C), म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर, फ्लॅग ऑफिसरांनी गौरवस्तंभ (नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथील सागरी स्मारकावरील विजय) येथे पुष्पचक्र  अर्पण करून राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व जवानांना आदरांजली वाहिली. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) एकात्मिक मुख्यालयात कार्मिक प्रमुख म्हणून काम केले आहे.  सैनिक स्कूल रेवा आणि खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ते माजी विद्यार्थी असून 1 जुलै 1985 रोजी त्यांना भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले.  दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धनीती विशेषज्ञ म्हणून, त्यांनी सिग्नल कम्युनिकेशन

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा दिन साजरा

इमेज
  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा दिन साजरा मुंबई- प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करण्यात आला.  विधी सेवा प्राधिकरणाच्या किमान समान कार्यक्रमातील मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबईचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रम्ह्ण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली नगर दिवाणी व सत्र न्यायालय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    मराठी भाषा व न्यायव्यवस्था या विषयावरील कर्मचारी व कुटुंबीय यांनी लिहिलेल्या निबंधांची   निबंध पुस्तिका 2023  प्रकाशित करण्यात आली. सदर कार्यक्रमात सत्र न्यायाधीश अ.म.पाटील यांनी मार्गदर्शन केले.  निबंध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्राधिकरणातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव अनंत देशमुख यांनी दिली.

शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धेत ५९५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

इमेज
शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धेत ५९५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग  लोकमानस प्रतिनिधी,  मुंबई- मुंबईतील सर्वात मोठा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार्‍या शिवजयंती उत्सव समिती घाटकोपर तर्फे यंदा २७ फेब्रुवारी- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धा” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत शिवकालीन इतिहासावर आधारित मराठी भाषेतील बहुपर्यायी १० प्रश्नांची लेखी परीक्षा घेण्यात आली असता स्पर्धेत घाटकोपरमधील विविध १४ शाळांमधील तब्बल ५९५० विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. घाटकोपरस्थित पुणे विद्याभवन, सरस्वती विद्या मंदिर, अभ्युदय विद्यालय, ज्ञानप्रकाश विद्यालय, स्वामी शामानंद हायस्कूल, सनग्रेस इंग्लिश हायस्कूल, श्रीसाईनाथ शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय, कै.तुळशीराम सावते विद्यालय, जय महाराष्ट्र मनपा शाळा, महेश्वरी विद्यालय, विवेक विद्यालय, सरस्वती विद्या निकेतन, श्री व्यंकटेश विद्या निकेतन या विविध शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वी वर्गाच्या विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यानी शालेय पुस्तकातील

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ठाकरे गटाची याचिका दाखल, शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ठाकरे गटाची याचिका दाखल,  शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश लोकमानस प्रतिनिधी  शिवसेना पक्ष व धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उध्दव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली.  मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.   ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे उत्तर मागितले आहे.  याबाबत दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होईल.  तोपर्यंत ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. 

19 मार्चला राज्यभर होणार अन्नत्याग उपोषण

19 मार्चला राज्यभर होणार अन्नत्याग उपोषण  पुणे- प्रतिनिधी येत्या 19 मार्च रोजी महाराष्ट्रभर अन्नत्याग उपवास केला जाणार आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. सत्ताधारी क्रूरपणे, विरोधी पक्ष बेजबाबदारपणे व मीडिया गाफीलपणे शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा करीत आहेत. याबद्दल किसानपुत्रांमध्ये रोष आहे, असे त्यांनी सांगितले. 21 फेब्रुवारी झालेल्या आढावा बैठकी नंतर अमर हबीब म्हणाले की, गडचिरोली पासून कोकणापर्यंतच्या प्रतिनिधींनी ते काय तयारी करीत आहेत या बाबत माहिती दिली. पुण्यात किसानपुत्र बालगंधर्व जवळ उपोषणाला बसतील त्या नंतर संध्याकाळी एसेम फौंडेशन येथे 'कोरडी शेती ओले डोळे' या पुस्तकावर आंतरभारतीच्या वतीने परिसंवाद होईल असे मयूर बागुल यांनी सांगितले. नितीन राठोड, विश्वास सूर्यवंशी,  आदी सहकार्य करणार आहेत.  आंबाजोगाईत पत्रकार उपोषणाला बसणार आहेत असे सांगून अनिकेत डिघोळकर म्हणाले की, सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शना खाली संध्याकाळी वसंत मुंडे यांचे व्याख्यान असयोजित केले आहे. शैलजा बरुरे यांनी स्वाराती महाविद्यालयातील विद्यार्थी मिरवणुकीने व्याख्यान स्थळी येतील अ

इस्लाम जिमखाना अध्यक्षपदी युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड

इमेज
 इस्लाम जिमखाना अध्यक्षपदी युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड लोकमानस प्रतिनिधी  इस्लाम जिमखाना संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार अॅड युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अब्राहनी यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत केलेल्या कामांमुळे प्रभावित झालेल्या सदस्यांनी अब्राहनी  व त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कार्यकारिणीला बिनविरोध निवडून दिले आहे.  इस्लाम जिमखान्याच्या नुकत्याच झालेल्या १२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेला जिमखान्याचे ३०४ सदस्य उपस्थित होते त्यापैकी ३०२ जणांनी बहुमताने हा निर्णय घेत असल्याचे जाहीर करण्यात आले.  २०२३ ते २०२७ या चार वर्षांसाठी या विद्यमान कार्यकारिणीला बिनविरोध निवडण्याचा निर्णय घेण्यात आला.  सध्या इस्लाम जिमखान्यामध्ये अध्यक्ष युसूफ अब्राहनी यांच्या नेतृत्वाखाली डॉ.युसूफ माचिसवाला-उपाध्यक्ष, डॉ. सुहेल फारुखी-सरचिटणीस, समीर मेमन डब्बावाला- सरचिटणीस, मुर्तूझा सेववाला-कोषाध्यक्ष, यांच्यासहित अॅड मोहसिन शेख, जुझेर मास्टर, इम्रान पलोबा, डॉ. खलील मेमन, अॅड दाऊद मांडवीवाला, अब्दुल रहीम खान,सैफी दलाल, अन्वर चौधरी, तबरेज शफी

गोरगरिबांचे डॉक्टर – डॉ. शरीफ गिरकर, तब्बल ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे धन्वंतरी

इमेज
  गोरगरिबांचे डॉक्टर – डॉ. शरीफ गिरकर   तब्बल ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे धन्वंतरी ------------------ मोंड पंचक्रोशीतच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम ठिकाणी जावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. शरीफ हसनखान गिरकर यांना परिसरातील आबालवृध्दांमध्ये अतिशय आदराचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड मध्ये १९७७ च्या सुमारास त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. होमिओपॅथीमध्ये एलसीईएच करुन त्यांनी मोंडसारख्या दुर्गम व ग्रामिण भागात दवाखाना सुरु केला.  मुंबईहून वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर मुंबई व इतर शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्याची संधी उपलब्ध असताना त्यांनी आपल्या गावी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्धार केला व तो पूर्णत्वास नेला.   सुरुवातीला बस सेवा,एसटी, रिक्षा सेवा उपलब्ध नसताना व तुरळक सेवा उपलब्ध असताना डॉ. गिरकर यांनी या परिसरातील गावागावांमध्ये जावून रुग्ण तपासणी केली आहे. कोकणातील सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचे भान राखून रुग्णांकडून अतिशय कमी शुल्क घेणे. अनेकदा स्वतःच्या खिशातून गरजू रुग्णांना बससाठी पैसे देणे यामध्ये डॉ गिरकर नेह

जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी - मंगलप्रभात लोढा

इमेज
जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी                        - पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा            लोकमानस प्रतिनिधी,    पुणे : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील ;  तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल ,  असे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.             शिवजयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव अंतर्गत भव्य महाशिव आरतीचे जुन्नर येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रवीण दरेकर ,  पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय ,  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,  पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,   माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ,  माजी आमदार शरद सोनवणे ,  जिल्हा नियोजन समिती सदस्य आशा बुचके  उपस्थित होते.             मंत्री  लोढा म्हणाले ,  यावर्षी शिवजयंतीला    उत्साहाचे वातावरण आहे. जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी शिवकालीन गाव उभे करण्यात येईल. पर्यट

राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न; मराठीतून घेतली शपथ

राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी संपन्न; मराठीतून घेतली शपथ लोकमानस प्रतिनिधी,  मुंबई - झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली.       शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.  सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.    कार्यक्रमाला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागा

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे,  निवडणूक आयोगाचा निर्णय लोकमानस प्रतिनिधी - मुंबई शिवसेना पक्ष व धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.  उध्दव ठाकरे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.   खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.  तर शिंदे गटाकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. ही बहुमताचा,  लोकशाहीचा विजय आहे.  बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे,  अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.  निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपल्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असताना शिंदे गटाला पक्षाचे नाव व पक्ष चिन्ह मिळाल्याने त्याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले होते व ठाकरे गट आणि शिंदे गटाला स्वतंत्र नाव व चिन्ह दिल

ठाणे महापालिकेच्या दिव्यांग निधीवाटपात घोटाळा,अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा आरोप

ठाणे महापालिकेच्या दिव्यांग निधीवाटपात घोटाळा, अखिल भारतीय दिव्यांग सेनेचा आरोप लोकमानस प्रतिनिधी - ठाणे   ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अर्थसाह्य योजनेमध्ये पारदर्शकता येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांकडून दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करण्यात येत नसून त्यातून आर्थिक घोटाळा करण्याचा उद्देश पालिका अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेने केला आहे.  दरम्यान, दिव्यांगांची नोंदणी करण्याबाबतही ठाणे महानगर पालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक  युसूफ  खान यांनी केला आहे. खान यांनी या संदर्भात ठाणे पालिकेशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने आता त्यांनी या संदर्भात थेट दिव्यांग आयुक्तांशी पत्रव्यवहार करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार,  ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येणार्या तरतुदीनुसार ठाणे पालिका परिक्षेत्रात राहणार्या दिव्यांगांना दरवर्षी केवळ 24 हजार रुपयांचा निधी देण्यात येत असतो. एवढ्या कमी निधीमधून दिव्यांगांना स्वत:चा उत्कर्ष साधता येत नाही. एक

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी घेतली राज्यपालांची भेट, मुलींचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अफगाणिस्तानची भारताला साद

इमेज
  अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी घेतली राज्यपालांची भेट, मुलींचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी अफगाणिस्तानची भारताला साद  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर इयत्ता ७ वी नंतर मुलींच्या शिक्षणावर बंदी  घालण्यात आली आहे. भारतात शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील महिलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी भारताने मदत करावी असे आवाहन अफगाणिस्तानच्या इस्लामी गणराज्याचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझाय यांनी आज येथे केले.        राजदूत फरीद मामुन्दझाय यांनी बुधवारी  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक, अफगाणिस्तानच्या दूतावासातील व्यापार विभाग प्रमुख कादीर शाह, शिक्षण प्रमुख सेदिकुल्ला शहर व अफगाणिस्तानच्या राजदूतांचे सचिव इद्रीस मामुन्दझाय उपस्थित होते. देशात तालिबानी राजवट असली तरी आपण तालिबानचे प्रतिनिधी नाही तर अफगाणिस्तानच्या जनतेचे प्रतिनिधी आहोत असे राजदूतांन

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली, ८६ पॅनल द्वारे १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश

  राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली , ८६ पॅनल द्वारे १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश प्रतिनिधी – मुंबई शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मुंबईत 1000 कोटीं पेक्षा जास्त वसुली करण्यात आली. ८६ पॅनल द्वारे एका दिवसात १३ हजार ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले.   मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मुंबई शहरातील विविध न्यायालयामध्ये प्रधान न्यायाधीश अनील सुब्रम्हण्यम   यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहरामध्ये एकूण 86 पॅनल स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 1 लाख 19 हजार 538 प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी 13 हजार 355 प्रकरणे निकाली काढण्यात यश आले. लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या रकमेचे मूल्य 1000 कोटींपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय लोक अदालत यशश्वी करण्याकरिता मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे   सचिव अनंत देशमुख यांनी विशेष   योगदान दिले.   लोक अदालतीच्या पूर्वी आठवड्याभरात साडेअकरा हजार प्रकरणे   निकाली शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालती

वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा- सरन्यायाधीश

  वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक   जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा- सरन्यायाधीश लोकमानस प्रतिनिधी          नागपूर :    विधि शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या वकील आणि भविष्यातील न्यायाधीशांनी आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार करावा , त्यामुळे त्यांना कधीच अपयश येणार नाही. कायदा आणि समाजाला , न्यायाच्या समांतर आणण्यासाठी वकील आणि न्यायाधीशांनी संविधानात्मक मुल्यासह पुढाकार घेणे आवश्यक आहे. समाजातील विषमता आणि जातीभेद यांच्यावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण विश्वात एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या दस्ताऐवजात परिवर्तनात्मक क्षमता असून प्रास्ताविकेत संविधानाचे तत्त्व अंगीकृत केलेले आहेत. त्यामुळे आपण विधिज्ञ म्हणून आर्थिक , सामाजिक आणि राजकीय न्याय सर्वांना देण्याचे वचन घेतले पाहिजे , असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित कर

13 राज्यात नवीन राज्यपाल, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस

13 राज्यात नवीन राज्यपाल,  महाराष्ट्राच्या राज्यपालपदी  रमेश बैस  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  केंद्र सरकारने देेशातील 13 राज्यांच्या राज्यपाल-उप राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.   अयोध्दा प्रकरणी निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सदस्य असलेले निवृत्त अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  नजीर यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप नोंदवले हरिचंद्रन-छत्तीसगड .  रिटायर्ड ब्रिगेडियर डॉ. बी डी मिश्रा यांना लडाखचे उप-राज्यपाल बनवण्यात आले आहे.  अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे.   लेफ्टनंट जनरल कैवल्य पटनाईक -  अरुणाचल प्रदेश, लक्ष्मण आचार्य - सिक्कीम, सी पी राधाकृष्णन- झारखंड, गुलाबचंद्र कटारिया- आसाम, शिव प्रसाद शुक्ला- हिमाचल प्रदेश, एल ए गणेशन- नागालँड, फागू चव्हाण- मेघालय, राजेंद्र अर्लेकर- बिहार, बिस्वा हरिचंद्रन- छत्तीसगड अश

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी 500 ठिकाणी आपला दवाखाना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी 500 ठिकाणी आपला दवाखाना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमानस प्रतिनिधी             मुंबई : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले.             राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत घोषणा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील  आपला दवाखानाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.             या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

इमेज
  ज्येष्ठ समाजसेवक , निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा लोकमानस प्रतिनिधी मुंबई दि   8 -   ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा   महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेट घेतली.      पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा , बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि   आदिवासी वाडी , वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले.   डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन , तलाव व स्वच्छता अभियान , रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव