इस्लाम जिमखाना अध्यक्षपदी युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड

 इस्लाम जिमखाना अध्यक्षपदी युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड

लोकमानस प्रतिनिधी 

इस्लाम जिमखाना संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार अॅड युसूफ अब्राहनी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अब्राहनी यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत केलेल्या कामांमुळे प्रभावित झालेल्या सदस्यांनी अब्राहनी  व त्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण कार्यकारिणीला बिनविरोध निवडून दिले आहे. 


इस्लाम जिमखान्याच्या नुकत्याच झालेल्या १२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेला जिमखान्याचे ३०४ सदस्य उपस्थित होते त्यापैकी ३०२ जणांनी बहुमताने हा निर्णय घेत असल्याचे जाहीर करण्यात आले.  २०२३ ते २०२७ या चार वर्षांसाठी या विद्यमान कार्यकारिणीला बिनविरोध निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सध्या इस्लाम जिमखान्यामध्ये अध्यक्ष युसूफ अब्राहनी यांच्या नेतृत्वाखाली डॉ.युसूफ माचिसवाला-उपाध्यक्ष, डॉ. सुहेल फारुखी-सरचिटणीस, समीर मेमन डब्बावाला- सरचिटणीस, मुर्तूझा सेववाला-कोषाध्यक्ष, यांच्यासहित अॅड मोहसिन शेख, जुझेर मास्टर, इम्रान पलोबा, डॉ. खलील मेमन, अॅड दाऊद मांडवीवाला, अब्दुल रहीम खान,सैफी दलाल, अन्वर चौधरी, तबरेज शफी शेख, शब्बीर क्वेट्टावाला, गुलाम चुनावाला, फारुख सुपारीवाला, मोहम्मद अली शेख हे कार्यकारिणी सदस्य कार्यरत आहेत. 

युसूफ अब्राहनी यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत इस्लाम जिमखानाने चांगले काम केले आहे. लोणावळा येथील प्रकल्प व स्वीमिंग पूल प्रकल्प मार्गी लावण्यासाठी या कार्यकारिणीने चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी या कार्यकारिणीवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा सदस्यांनी निर्णय घेतल्याची माहिती जिमखान्यातर्फे देण्यात आली.

याबाबत अध्यक्ष युसूफ अब्राहनी म्हणाले, आपल्या गेल्या चार वर्षांच्या कालावधीत दोन वर्षे कोरोना मुळे वाया गेली मात्र उर्वरित कालावधीत आम्ही चांगले काम केले त्याला सदस्यांनी दुजोरा देत आमच्यावर विश्वास ठेवला व आमची आणखी चार वर्षांसाठी बिनविरोध निवड केली. सदस्यांनी आमच्यावर ठेवलेल्या या विश्वासाला आम्ही पात्र ठरु व अधिक चांगले काम करुन प्रलंबित प्रकल्प पूर्ण करु, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही