मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा दिन साजरा

 

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा दिन साजरा

मुंबई- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करण्यात आला.


 विधी सेवा प्राधिकरणाच्या किमान समान कार्यक्रमातील मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबईचे प्रधान न्यायाधीश अनिल सुब्रम्ह्ण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली नगर दिवाणी व सत्र न्यायालय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  मराठी भाषा व न्यायव्यवस्था या विषयावरील कर्मचारी व कुटुंबीय यांनी लिहिलेल्या निबंधांची  निबंध पुस्तिका 2023 प्रकाशित करण्यात आली. सदर कार्यक्रमात सत्र न्यायाधीश अ.म.पाटील यांनी मार्गदर्शन केले. 


निबंध स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्राधिकरणातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव अनंत देशमुख यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब