13 राज्यात नवीन राज्यपाल, महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस

13 राज्यात नवीन राज्यपाल,  महाराष्ट्राच्या राज्यपालपदी  रमेश बैस 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 
केंद्र सरकारने देेशातील 13 राज्यांच्या राज्यपाल-उप राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत.  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे.  
अयोध्दा प्रकरणी निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सदस्य असलेले निवृत्त अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  नजीर यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी आक्षेप नोंदवले हरिचंद्रन-छत्तीसगड . 

रिटायर्ड ब्रिगेडियर डॉ. बी डी मिश्रा यांना लडाखचे उप-राज्यपाल बनवण्यात आले आहे.  अनुसुईया उईके यांची मणिपूरच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे.  
लेफ्टनंट जनरल कैवल्य पटनाईक -  अरुणाचल प्रदेश, लक्ष्मण आचार्य - सिक्कीम, सी पी राधाकृष्णन- झारखंड, गुलाबचंद्र कटारिया- आसाम, शिव प्रसाद शुक्ला- हिमाचल प्रदेश, एल ए गणेशन- नागालँड, फागू चव्हाण- मेघालय, राजेंद्र अर्लेकर- बिहार, बिस्वा हरिचंद्रन- छत्तीसगड अशी जबाबदारी देण्यात आली आहे.  




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही