सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश


लाड- पागे समितीच्या शिफारशी लागू केल्याबद्दल सफाई कामगारांकडून देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार
सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला यश 
लोकमानस प्रतिनिधी
लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करीत सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकी हक्काचे घर व इतर प्रश्न सोडवत सुस्पष्ट आदेश जारी केल्याबद्दल आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले.  राज्यातील सफाई कामगारांना लाड पांडे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मंत्री मंडळ उपसमितीने हा निर्णय जारी केला. या ऐतिहासिक निर्णयामुळे सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांना नोकरीत प्राधान्य व इतर सोयी - सूविधा मिळण्याचा मार्ग सुखकर होईल. या सर्व मागण्यांसाठी आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत असलेल्या सफाई कर्मचारी विकास महासंघाच्या सततच्या लढ्याला हे मोठे यश मिळाले आहे.
याप्रसंगी मयुर देवळेकर, योजना ठोकळे, अनिल कांबळे, उदय पडेलकर, विजयभाऊ पवार, गिरधर मारु, दिपक पवार, कुंजाली मोरे, सतिश कांबळे, रविना जाधव, राजेश तांबे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही