निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ठाकरे गटाची याचिका दाखल, शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ठाकरे गटाची याचिका दाखल, 
शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
लोकमानस प्रतिनिधी 
शिवसेना पक्ष व धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उध्दव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली.  मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.  
ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे उत्तर मागितले आहे.  याबाबत दोन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होईल.  तोपर्यंत ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब