शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे,  निवडणूक आयोगाचा निर्णय
लोकमानस प्रतिनिधी - मुंबई
शिवसेना पक्ष व धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.  उध्दव ठाकरे यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.  
खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.  तर शिंदे गटाकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. ही बहुमताचा,  लोकशाहीचा विजय आहे.  बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे,  अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. 

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपल्या समर्थनार्थ कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका प्रलंबित असताना शिंदे गटाला पक्षाचे नाव व पक्ष चिन्ह मिळाल्याने त्याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरते गोठवले होते व ठाकरे गट आणि शिंदे गटाला स्वतंत्र नाव व चिन्ह दिले होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही