पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थसंकल्पावर शुक्रवारी चर्चासत्र, ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजन

  अर्थसंक ल्पावर शुक्रवारी चर्चासत्र, ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजन लोकमानस प्रतिनिधी मुंबई ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने " भारतीय अर्थसंकल्प 2023-2024" हे चर्चासत्र शुक्र वारी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. रॉ यल मुंबई यॉट क्लब मधील ॲन्करेज रूम मध्ये हे चर्चासत्र होईल. या चर्चासत्रात 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर चर्चा केली जाईल. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी भाग घेणार असून अर्थसंकल्पातील विविध मुद्दय़ांवर आपापले विश्लेषण सादर करणार आहेत.   प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट पंडित स्नेहल मुझुमदार या चर्चासत्राचे सूत्र संच लन करणार आहेत. पंडित मुझुमदार हे जागतिक कीर्तीचे संतुरवादकही आहेत. या चर्चासत्रात   सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एन. राजशेखरन पिल्लई,   अर्थतज्ज्ञ   प्रा. डॉ. चंद्रहास देशपांडे ,     वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट चे प्रमुख कार्यकारी अधिकारी अजय ठाकूर ,      ब्रिगेडियर हेमंत महाजन ( नि

फ्रान्सचे महावाणिज्यदूत जाँ मार्क सेरे शार्ले यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

इमेज
फ्रान्सचे महावाणिज्यदूत जाँ मार्क सेरे शार्ले यांनी  घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची  सदिच्छा भेट लोकमानस प्रतिनिधी मुंबई  भारत आणि फ्रान्सचे मैत्रीसंबंध दृढ असून फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जागतिक अधिष्ठान दिले. भारताच्या राज्यघटनेवर या मूल्यांचा प्रभाव आहे. महिला सबलीकरण संदर्भात फ्रान्स येथील स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांतील प्रतिनिधींनी मुंबईस अवश्य भेट द्यावी. उभयपक्षी माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान स्त्री समानतेच्या चळवळीला नवा आयाम प्राप्त करुन देईल, असा विश्वास महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत जाँ मार्क सेरे शार्ले यांनी उप सभापती डॉ. गोऱ्हे यांची विधान भवनातील त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी जागतिक स्तरावर सुरु असलेले स्त्री समानता विषयक कार्यक्रम, उपक्रम, परिषदा याबाबत उभयतांमध्ये सविस्तर चर्चा झाली. फ्रान्समधील स्त्री समानता विषयक उपक्रमातील सहभागी गटनेत्यांना यावेळी मुंबई भेटीचे आमंत्रण देण्यात आले. फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन आणि स्वित्झर्लंड य

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा ”  गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा मुंबई : कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून  अंगीकारण्यात येणार आहे.  या राज्यगीतासाठी औचित्यपालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील तयार करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत शासनामार्फत राज्यगीत तयार करण्यात आले नाही अथवा अधिकृतपणे कोणत्याही गीतास राज्यगीताचा दर्जा देण्यात आला नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, राज्याचे अधिकृत राज्यगीत असावे यासाठी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या कविवर्य राजा नीळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरणांचे गीत "महाराष्ट्राचे राज्यगीत" म्हणून स्वीकारण्यात आले आहे. हे राज्यगीत १.४१ मिनिट अवधीचे आहे.   महाराष्ट्र

रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद

इमेज
  रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मुंब्रा – प्रतिनिधी   मुंब्रा कौसा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. संघर्ष व मुंब्रा रनर्स यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियमजवळ यासाठी रविवारी भल्या पहाटे स्पर्धकांनी मोठी गर्दी केली होती. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे तीन हजार पेक्षा अधिक जणांनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली होती. संघर्ष संस्थेच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले व स्पर्धेला यशस्वी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून क्रीडा संस्कृती वृध्दींगत होत असल्याने अशा स्पर्धांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आव्हाड म्हणाल्या. मुंब्रा रनर्सचे डॉ. असीर इनामदार यांनी स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोलाचे सहकार्य केलेल्यांचे आभार व्यक्त केले. मुंब्रा मधील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत, फिटनेसबाबत जनजागृती करणे, मुलांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्दे

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे

इमेज
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांचा विजय झाला.  त्यांना 78 मते मिळाली. सोमवारी संघाची द्वैवार्षिक निवडणूक झाली व सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आले.  अध्यक्षपदाचे उमेदवार राजा आदाटे यांना 49 मते तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली.   संघाच्या उपाध्यक्षपदी महेश पवार विजयी झाले.   तर कार्यवाहपदी प्रविण पुरो यांनी विजय मिळवला.  कोषाध्यक्षपदी विनोद यादव निवडून आले.   कार्यकारिणी सदस्यपदी आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब विजयी झाले.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले. 

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम

  महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)  संचालनालयाने प्रतिष्ठेचे ‘प्रधानमंत्री बॅनर’ पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी त्यासाठी संचालनालयाचे अभिनंदन केले आहे. राज्य शासनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी दिल्ली येथील कॅन्टॉन्मेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅलीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या  बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री  मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्

पीआरपीच्या मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे

इमेज
पीआरपीच्या  मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे  लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा: पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या  मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  घोरपडे यांनी मुंब्रा मध्ये केलेल्या सामाजिक  कामाची व लॉकडाऊन कालावधीत केलेल्या  कामाची दखल घेत त्त्यांना मुंब्रा शहर  अध्यक्ष या पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.  पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद ताले , महिला ठाणे जिल्हाध्यक्ष जया रिझवानी, ठाणे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत जगताप  यांच्या उपस्थितीत प्रणय घोरपडे यांना पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.तसेच त्यांना पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या.  घोरपडे यांनी नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.  जोगेंद्र कवाडे यांची भेट घेतली. कवाडे यांनी घोरपडे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

प्रा. एन. एम. राजाध्यक्ष यांचे निधन

इमेज
प्रा. एन. एम.  राजाध्यक्ष यांचे निधन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाचे माजी अधिष्ठाता व माटुंगा येथील न्यू लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य एन. एम.  राजाध्यक्ष यांचे शुक्रवारी निधन झाले.   त्यांच्यावर काही कालावधीपासून उपचार सुरु होते. शनिवारी भोईवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येतील. राजाध्यक्ष यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात दु:ख व्यक्त केले जात आहे.  

महावितरणची रेकॉर्ड ब्रेक दरवाढ मागणी - सरासरी २.५५ रु. प्रति युनिट म्हणजे ३७% दरवाढीची याचिका जाहीर , ग्राहक व संघटनांनी हरकती दाखल करणे आवश्यक - प्रताप होगाडे

महावितरणची रेकॉर्ड ब्रेक दरवाढ मागणी - सरासरी २.५५ रु. प्रति युनिट म्हणजे ३७% दरवाढीची याचिका जाहीर ,  ग्राहक व संघटनांनी हरकती दाखल करणे आवश्यक - प्रताप होगाडे  लोकमानस प्रतिनिधी   - महावितरण कंपनीने रेकॉर्ड ब्रेक दरवाढीची मागणी केलेली आहे. महावितरणने आगामी दोन वर्षांमध्ये ६७,६४४ कोटी रुपये तूट भरपाईची मागणी केली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशोब करता ही मागणी म्हणजे दरवाढ सरासरी २.५५ रु. प्रति युनिट इतकी म्हणजे सरासरी ३७% दरवाढीची आहे. स्थिर वा मागणी आकार, वीज आकार व वहन आकार या तिन्ही आकारांत वाढीची मागणी असून एकूण परिणामी वाढ सरासरी २.५५ रु. प्रति युनिट आहे. दरवाढीच्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ड्यूटी रकमेचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार तो वेगळाच आहे. इतकी प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षांत  प्रथमच करण्यात आलेली आहे. देशात सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्व सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी, येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या  उद्योगांना राज्याबाहेर ढकलणारी आहे.   महावितरणच्या या भरमसाठ दरवाढ मागणीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व वीज ग्राहक

पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातीलबोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला

इमेज
पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,   ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पातील बोगदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खुला लोकमानस प्रतिनिधी  ठाणे: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे  काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई व ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते कट

शिंदे सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर ३४ नव्हे ४० खासदार निवडून येतील - महेश तपासे

शिंदे सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर ३४ नव्हे ४० खासदार निवडून येतील - महेश तपासे लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - 'इंडिया टूडे सी वोटर मुड ऑफ  द नेशन' या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे - फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.  आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना हे मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे - फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा 'दुध का दुध आणि पानी का पानी' होऊन जाईल असेही महेश तपासे म्हणाले. उध्दव ठाकरे यांची कामगिरी महाविकास आघाडी सरकारमध्ये उजवी ठरली होती त्यामुळेच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत उध्दव ठाकरे यांना स्थान मिळवता आले मात्र आताच्या मुख्यमंत्र्यांना पाचमध्येही स्थान मिळवता आले नाही याचा अर्थ जनतेने त्यांना नाकारल्याचे

दिवा जंक्शन व ठाणे स्टेशन वरील विविध समस्या बाबत आ.संजय केळकर यांनी घेतली डीआरएमची भेट

इमेज
दिवा जंक्शन व ठाणे  स्टेशन वरील विविध समस्या बाबत आ.संजय केळकर यांनी घेतली डीआरएमची  भेट लोकमानस प्रतिनिधी ठाणे:-ठाणे जंक्शन स्टेशन वर बूट पॉलिश करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांच्या विविध मागण्या व दिवा जंक्शन स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक1,2,3 व 4 या स्टेशनची उंची तात्काळ वाढवण्यात यावी जेणेकरून प्रवाशांना उतरण्यास त्रास होणार नाही व अपघाताचे प्रमाण कमी प्रमाणात होईल यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची मुंबई येथे भेट घेतली.  दिवा स्टेशन वरील सर्व फलाट  वर पाण्याची सुविधा तात्काळ करण्यात यावी जेणेकरून प्रवासाची गैरसोय होणार नाही. तसेच कोकण रेल्वे मार्गावर आगासन थांब्यावरती कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर गाडीचा थांबा लवकरात लवकर देण्यात यावा जेणेकरून कोकणात जाणाऱ्या लोकांचे हाल होणार नाहीत व नोकरदार वर्ग व शाळकरी मुलांना जाण्या येण्याची गैरसोय होणार नाही अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवा स्टेशनवरील आर ओ बी ब्रिज चे काम संथ गतीने चालू आहे, या संदर्भात तात्काळ ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून बाधितांना योग्य तो मोबदला देऊन लवकर

अँड.आदेश भगत यांची दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती

इमेज
अँड.आदेश भगत यांची दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती लोकमानस प्रतिनिधी  ठाणे  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने अँड.आदेश कमलाकर भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठी असून भाजपचे प्रमुख पदाधिकारी, दिव्यातील लाखो रेल्वे प्रवाशांचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेलले अँड.आदेश भगत यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. रोखठोक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे अँड.आदेश भगत यांनी केलेल्या अनेक उठाव व आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिवेकरांचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.  पक्षांतर्गत कुरघोडीमुळे त्यांनी राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत

राज्यातील बारा जणांना पद्म पुरस्कार

राज्यातील बारा जणांना पद्म पुरस्कार दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच  महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इद

कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण

  कोकण रेल्वे परिसरातील ३७ स्थानकांचे होणार सुशोभीकरण लोकमानस प्रतिनिधी  मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र

राज्यपालांना द्यायचा आहे राजीनामा, पंतप्रधानांकडे व्यक्त केली इच्छा

  राज्यपालांना द्यायचा आहे राजीनामा,   पंतप्रधानांकडे व्यक्त केली इच्छा लोकमानस प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यायचा आहे. राज्यपालांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन केले आहे. मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजभवनने याबाबत प्रसिध्दीपत्रक काढून माहिती दिली.   निवेदनात राज्यपाल म्हणतात - महाराष्ट्रासारख्या संत , समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक , राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

शिव वाहतूक सेनेच्या महारक्तदान शिबीरात ४७६ रक्तदात्यांचा सहभाग

इमेज
शिव वाहतूक सेनेच्या महारक्तदान शिबीरात ४७६ रक्तदात्यांचा  सहभाग   लोकमानस प्रतिनिधी मुंबई-  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे जे.बी.नगर, अंधेरी येथील सत्यनारायण गोयंका भवनमध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ७०० पेक्षा अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर ४७६ रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले.  युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या रक्तदान शिबीरास विशेष उपस्थिती लावली. तसेच शिवसेना जेष्ठ नेते सुभाष देसाई, माजी केंद्रीय मंत्री खा.अरविंद सावंत, माजी मंत्री विभागप्रमुख आ.अनिल परब, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई, सुरज चव्हाण, उपनेते अमोल किर्तीकर, राजकुमार बाफना आदि मान्यवरांनी या शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन शिव वाहतूक सेना पदाधिकारी आणि रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.  उपक्रमाचे आयोजक तथा शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस निलेश भोसले, कोषाध्यक्ष विनय मोरे, विधानसभा संघटक सुभाष सावंत यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. प्रबोधन गोर

वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या युतीची घोषणा बाळासाहेब ठाकरेंची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या परखड विचारांशी मिळणारी- सेना व वंचित ची भूमिका

    वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या युतीची घोषणा बाळासाहेब ठाकरेंची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या परखड विचारांशी मिळणारी- सेना व वंचित ची भूमिका लोकमानस प्रतिनिधी मुंबई – वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली आहे.   वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेने आम्ही एकत्र का आलो ? याबाबत निवेदन दिले आहे. देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात ( 25 नोव्हेंबर 1949

नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इमेज
 नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  लोकमानस प्रतिनिधी  ठाणे-  कोकण बॅंकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षांतर्फे त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर पूर्ण ठाणे शहरात लावण्यात आले होते. राजकीय वर्तुळात मुल्ला यांच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा होती.   मुंब्रा येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे यांनी मुल्ला यांना  शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. राजन किणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक असले तरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे किणे यांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असल्याने मुल्ला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु झाली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते तथा ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नजीब मुल्ला यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली व मुल्ला  यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुल्ला यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला जोर आला.  मात्र मुल्ला यांनी या चर्चेचे ख

मुंबईत होहो बस सेवेचा शुभारंभ

इमेज
मुंबईत  होहो बस सेवेचा शुभारंभ         पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन- पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा लोकमानस प्रतिनिधी मुंबई  : पर्यावरणपुरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 'जवाबदार पर्यटन' उपक्रम राबविण्यात येणार आहे.मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हो हो बसची सुविधा सुरू केली आहे. दुमजली असलेल्या या  एका बसचे  लोकार्पण पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  करण्यात आले. पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.महामंडळाच्या चित्रफित,छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे विमोचन,अंजिठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॅालेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ  करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मंत्री  लोढा यांनी सांगितले.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

  मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते   लोकार्पण मुंबई : बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास   वेगवान करणाऱ्या   मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ (टप्पा-२) या मार्गिकांचे   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते   लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  आमदार आशिष शेलार , माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव , एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते. दरम्यान   मुंबई-१ कार्ड आणि मेट्रो अॅप एनसीएमसी कार्डचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्थानक येथे मेट्रो प्रकल्पाच्या   छायचित्रांचे प्रदर्शन आणि थ्रीडी आराखड्याची पाहणी केली. आणि मेट्रो स्टेशनवर स्वतः मेट्रोचे तिकीट घेऊन गुंदवली मेट्रो स्टेशन ते मोग