अँड.आदेश भगत यांची दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती


अँड.आदेश भगत यांची दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती
लोकमानस प्रतिनिधी 
ठाणे 
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  व कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने अँड.आदेश कमलाकर भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना दिवा उपशहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठी असून भाजपचे प्रमुख पदाधिकारी, दिव्यातील लाखो रेल्वे प्रवाशांचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेलले अँड.आदेश भगत यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. रोखठोक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे अँड.आदेश भगत यांनी केलेल्या अनेक उठाव व आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य दिवेकरांचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. 
पक्षांतर्गत कुरघोडीमुळे त्यांनी राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. येणाऱ्या पालिका निवडणूका लक्षात घेता अँड.आदेश भगत यांच्यावर पक्षाने मोठी जवाबदारी दिली असल्याचे कळते.

दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्य खूप मोठे आहे. खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दिव्यात अनेक विकास कामे झाली असून अनेक विकास कामे प्रगती पथावर आहेत. दिवा शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी व इतर नगरसेवकांच्या माध्यमातून देखील अनेक कामे मार्गी लागली आहेत. ही सर्व कामे दिवावसीयांपर्यंत पोहचवण्याचे मोठे काम आम्हला करायचे आहे. पक्षाने मोठी जवाबदारी खांद्यावर दिली असल्यामुळे पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे अँड.आदेश भगत यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही