राज्यपालांना द्यायचा आहे राजीनामा, पंतप्रधानांकडे व्यक्त केली इच्छा

 

राज्यपालांना द्यायचा आहे राजीनामा,  पंतप्रधानांकडे व्यक्त केली इच्छा

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाचा राजीनामा द्यायचा आहे. राज्यपालांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदन केले आहे. मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. राजभवनने याबाबत प्रसिध्दीपत्रक काढून माहिती दिली. 

निवेदनात राज्यपाल म्हणतात -

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब