मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांचा विजय झाला.  त्यांना 78 मते मिळाली. सोमवारी संघाची द्वैवार्षिक निवडणूक झाली व सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आले. 
अध्यक्षपदाचे उमेदवार राजा आदाटे यांना 49 मते तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली.  
संघाच्या उपाध्यक्षपदी महेश पवार विजयी झाले.  
तर कार्यवाहपदी प्रविण पुरो यांनी विजय मिळवला.  कोषाध्यक्षपदी विनोद यादव निवडून आले.  
कार्यकारिणी सदस्यपदी आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब विजयी झाले. 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब