वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या युतीची घोषणा बाळासाहेब ठाकरेंची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या परखड विचारांशी मिळणारी- सेना व वंचित ची भूमिका

 

 

वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या युतीची घोषणा

बाळासाहेब ठाकरेंची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या परखड विचारांशी मिळणारी- सेना व वंचित ची भूमिका

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई – वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात आली. शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली आहे.

 

वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेने आम्ही एकत्र का आलो? याबाबत निवेदन दिले आहे.

देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत!

 

शिवसेना नेते, सुभाष देसाई व वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता

सिद्धार्थ मोकळे या दोघांच्या स्वाक्षरीने याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही