रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद

 

रन फॉर युनिटी - मुंब्रा मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद

मुंब्रा – प्रतिनिधी  

मुंब्रा कौसा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिटी या मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद मिळाला. संघर्ष व मुंब्रा रनर्स यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियमजवळ यासाठी रविवारी भल्या पहाटे स्पर्धकांनी मोठी गर्दी केली होती. विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे तीन हजार पेक्षा अधिक जणांनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली होती.



संघर्ष संस्थेच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्यांचे अभिनंदन केले व स्पर्धेला यशस्वी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. अशा प्रकारच्या स्पर्धांमधून क्रीडा संस्कृती वृध्दींगत होत असल्याने अशा स्पर्धांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आव्हाड म्हणाल्या.


मुंब्रा रनर्सचे डॉ. असीर इनामदार यांनी स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोलाचे सहकार्य केलेल्यांचे आभार व्यक्त केले. मुंब्रा मधील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत, फिटनेसबाबत जनजागृती करणे, मुलांमध्ये क्रीडा संस्कृती रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता, अशी माहिती इनामदार यांनी दिली. स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. एस.के. बिल्डर्स, नुरी ग्रुप यांनी या स्पर्धेचे प्रायोजक होते. ऋता आव्हाड, शब्बीर खान, अझिम शेख, मर्जिया शानु पठाण, डॉ.असीर इनामदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ८ ते १२ वयोगटासाठी १.६ किमी, १३ ते ५० वयोगटासाठी ३ किमी व ५ किमी व ५० वर्षांवरील वयोगटासाटी १.६ किमी अंतराच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही