शिव वाहतूक सेनेच्या महारक्तदान शिबीरात ४७६ रक्तदात्यांचा सहभाग


शिव वाहतूक सेनेच्या महारक्तदान शिबीरात ४७६ रक्तदात्यांचा  सहभाग 
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई-  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे जे.बी.नगर, अंधेरी येथील सत्यनारायण गोयंका भवनमध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ७०० पेक्षा अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर ४७६ रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले.
 युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या रक्तदान शिबीरास विशेष उपस्थिती लावली. तसेच शिवसेना जेष्ठ नेते सुभाष देसाई, माजी केंद्रीय मंत्री खा.अरविंद सावंत, माजी मंत्री विभागप्रमुख आ.अनिल परब, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई, सुरज चव्हाण, उपनेते अमोल किर्तीकर, राजकुमार बाफना आदि मान्यवरांनी या शिबिरास प्रत्यक्ष भेट देऊन शिव वाहतूक सेना पदाधिकारी आणि रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. 

उपक्रमाचे आयोजक तथा शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस निलेश भोसले, कोषाध्यक्ष विनय मोरे, विधानसभा संघटक सुभाष सावंत यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. प्रबोधन गोरेगाव संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे प्रमुख रमेश इस्वलकर यांनी सदर शिबीरचे वैद्यकीय व्यवस्थापन पार पाडले. संघटनेचे सभासद रिक्षाचालक आणि तरुणांसह यापूर्वी ५७ वेळा रक्तदान करणारे पोलीस हवालदार बलराज साळोखे यांनीही या शिबीरात स्वत: रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही