पीआरपीच्या मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे

पीआरपीच्या  मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंब्रा: पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या  मुंब्रा शहर अध्यक्ष पदी प्रणय घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
घोरपडे यांनी मुंब्रा मध्ये केलेल्या सामाजिक  कामाची व लॉकडाऊन कालावधीत केलेल्या 
कामाची दखल घेत त्त्यांना मुंब्रा शहर  अध्यक्ष या पदाची जवाबदारी देण्यात आली आहे.
 पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद ताले , महिला ठाणे जिल्हाध्यक्ष जया रिझवानी,
ठाणे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत जगताप  यांच्या उपस्थितीत प्रणय घोरपडे यांना पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.तसेच त्यांना पुढील वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या. 

घोरपडे यांनी नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.  जोगेंद्र कवाडे यांची भेट घेतली. कवाडे यांनी घोरपडे यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही