अर्थसंकल्पावर शुक्रवारी चर्चासत्र, ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजन

 

अर्थसंकल्पावर शुक्रवारी चर्चासत्र,

ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आयोजन

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई

ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने "भारतीय अर्थसंकल्प 2023-2024" हे चर्चासत्र शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. रॉयल मुंबई यॉट क्लबमधील ॲन्करेज रूम मध्ये हे चर्चासत्र होईल.

या चर्चासत्रात 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर चर्चा केली जाईल. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी भाग घेणार असून अर्थसंकल्पातील विविध मुद्दय़ांवर आपापले विश्लेषण सादर करणार आहेत.

 

प्रख्यात चार्टर्ड अकाऊंटंट पंडित स्नेहल मुझुमदार या चर्चासत्राचे सूत्रसंचलन करणार आहेत. पंडित मुझुमदार हे जागतिक कीर्तीचे संतुरवादकही आहेत. या चर्चासत्रात  सोमय्या विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एन. राजशेखरन पिल्लई,  अर्थतज्ज्ञ  प्रा. डॉ.चंद्रहास देशपांडे,   वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अजय ठाकूर,    ब्रिगेडियर हेमंत महाजन ( निवृत्त ), जी.एस.टी.विशेषज्ञ गोविंद पिंगळे, पर्यावरणतज्ञ नितीन गोरे, करविषयक कायदेतज्ञ मृगाक्षी जोशी या चर्चासत्रात आपले विचार मांडतील. या माहितीपूर्ण चर्चासत्रामध्ये सर्वांना प्रेक्षक म्हणून विनामूल्य प्रवेश आहे. आपण अवश्य वेळेवर यावे, असे आवाहन ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संस्थापक आणि प्रवर्तक व सचिव डॉ. संजय भिडे यांनी केले आहे.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही