नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

लोकमानस प्रतिनिधी 

ठाणे- 

कोकण बॅंकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षांतर्फे त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर पूर्ण ठाणे शहरात लावण्यात आले होते. राजकीय वर्तुळात मुल्ला यांच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा होती. 


 मुंब्रा येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे यांनी मुल्ला यांना  शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. राजन किणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक असले तरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे किणे यांनी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असल्याने मुल्ला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरु झाली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते तथा ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नजीब मुल्ला यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली व मुल्ला  यांना आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मुल्ला यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला जोर आला.  मात्र मुल्ला यांनी या चर्चेचे खंडन केले. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असून म्हस्के व इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपल्याला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या त्या प्रेमापोटी दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा दिल्या म्हणजे थेट त्यांच्या पक्षात प्रवेश करणे असे समजणे राजकीय अपरिपक्वतेचे निशाण असल्याचे मुल्ला म्हणाले. 


येऊर येथे मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मुंबईतील राजकीय, सामाजिक, प्रशासन,  बॅंकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे, सिराज डोंगरे, अब्दुल अजीज शेख (बाटा), कोकण बॅंकेचे उपाध्यक्ष आसिफ दादन, राजू अन्सारी, जफर नोमानी व इतरांनी मुल्ला यांची भेट घेत त्यांचे अभिष्टचिंतन केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसिन शेख, हमिदुल्ला शेख, रिझवान मुल्ला, मुस्तफा लाल खान, अन्वर शफी शेख, समीर शेख, मोहसिन एमके  व इतरांनी परिश्रम घेतले. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही