पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत

शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत पाच महत्वाचे ठराव पारीत प्रतिनिधी गडचिरोली - गडचिरोली येथे सुरु असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी शेती, महिला, गायरान जमिनी आणि ५ च्या अनुसूचीसंदर्भातील महत्वाचे पाच ठराव समिती सदस्यांच्या अनुमोदनासह सर्वानुमते पारीत करण्यात आले. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, आ.श्यामसुंदर शिंदे, ज्येष्ठ नेते प्रा.एस.व्ही.जाधव, पुरोगामी महिला संघटनेच्या अध्यक्ष आशा शिंदे, मुंबई कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता हॉटेल लेक व्ह्यू येथे पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी मंचावर बाबासाहेब देशमुख, ॲड.राहुल देशमुख, बाबासाहेब कारंडे, काकासाहेब शिंदे उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला संविधान दिनानिमित्त साम्या कोरडे हिने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन सर्वांना शपथ दिली. त्यानंतर अॅड.राजेंद्र कोरडे यांनी दोन दिवसीय बैठकीची रुपरेषा सांगितली. सुरुवातीला प्रा.एस.व्ही.जाधव यांनी ‘शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा’, असा पहिला ठराव मांडला. बी

२६/११ शहीद जवानांच्या स्मरणार्थ शिव वाहतूक सेनेचे रक्तदान शिबीर

इमेज
२६/११ शहीद जवानांच्या स्मरणार्थ शिव वाहतूक सेनेचे रक्तदान शिबीर  प्रतिनिधी  मुंबई- शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे आणि मीनाताई ठाकरे रक्त केंद्र (प्रबोधन रक्तवाहिनी) यांच्या विशेष सहकार्याने २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज कार्निवल मॅाल, भगतसिंग नगर, गोरेगाव प. येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.  याप्रसंगी शिवसेना नेते-माजी मंत्री सुभाष देसाई, उपनेते अमोल किर्तीकर, शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस-भा.का.से चिटणीस निलेश भोसले, उपाध्यक्ष साजीद सुपारीवाला, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख भरत बोराडे, जितेंद्र इंगळे, सत्तार शेख उपस्थित होते.  शिव वाहतूक सेनेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष चंद्रकांत नायक यांच्या पुढाकाराने आयोजित या रक्तदान शिबीरात संघटनेच्या सभासद रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या.

ज्योती अळवणी यांची “अं त र” वेब फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला

इमेज
ज्योती अळवणी यांची “अं त र” वेब फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला प्रतिनिधी  माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांनी लिहिलेली आणि निर्मित केलेली 'अंतर' ही  वेब फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . अनय म्हणजेच सुयश टिळक आणि श्रिया म्हणजेच आकांक्षा गाडे यांनी या वेब फिल्म मध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. देवेशच्या भूमिकेत अंकित म्हात्रे ने काम केले आहे. लग्नानंतर नात्यांमध्ये होणारे हळुवार बदल, वेळीस होणारी कोंडी, कधी होणारे प्रेमळ संवाद तर कधी येणारा दुरावा याबद्दल लेखिका ज्योती आळवणी यांनी या फिल्ममध्ये भाष्य केले आहे.  प्रेमाच्या त्यातून येणाऱ्या दुराव्याच्या खऱ्या भावना उलगडणारं रोमँटिक गाण देखील या फिल्ममध्ये आहे. कृणाल राणे या तरुण दिग्दर्शकाने हे हळुवार नातं अलगद उलगडले आहे आणि संकलित देखील केले आहे.  छायाचित्रण सुयश आचार्य  तर म्युजिक अभिमन्यू कार्लेकर आणि चेतन फेफरने केले आहे .ही फिल्म 25 नोव्हेंबर रोजी फिल्लंबाझ फिल्म कंपनी या युटुब चॅनेलवर रिलीज होते आहे.

हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इमेज
हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा प्रतिनिधी  मुंबई भारतीय जनता पक्षाचे नेते, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल चे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.   नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या, ट्रान्सपोर्ट सेल च्या पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या असंख्य वर्गाने त्यांचा वाढदिवस सलामती पीर, रेम्बो अपार्टमेंट कुर्ला येथील निवासस्थानी मोठया उत्साहात व जल्लोषात वाढदिवस साजरा केला.  वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हाजी अरफात शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  "धन्यवाद मोदी जी" अभियान राबविले. सदर अभियानात माजी मंत्री तथा आमदार आशिष शेलार, बीजेपी प्रवक्त्या श्वेता शालिनी, माजी आमदार/ वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष  मंगेश सांगळे,  अभिनेत्री / वाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्षा ईशा कोपीकर तसेच मोठया संख्येने वाहतूक संघटनेच्या  पदाधिकाऱ्यानी मिळुन ४५,००० पत्रे स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिली. हाजी अरफात शेख यांनी या प्रसंगी सर्वांचे मनापासून आभार मानले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांचा राजीनामा

इमेज
  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांचा राजीनामा प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ विधिज्ञ तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार एड मजीद मेमन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मेमन हे गेल्या १६ वर्षांपासून राष्ट्रवादी मध्ये होते. २०१४ ते २०२० या कालावधीत ते पक्षातर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून कार्यरत होते. मेमन यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्यानंतर त्यांनी आज ट्वीट करत पक्ष सोडत असल्याची माहिती दिली आहे. आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे आपण पक्ष सोडत असून शरद पवार व राष्ट्रवादी परिवाराकडून गेल्या १६ वर्षांत मिळालेले प्रेम व सहकार्य याबाबत त्यांनी आभार मानले आहेत. मेमन हे कोणत्या पक्षात प्रवेश करतात याबाबत उत्सुकता आहे.     गेल्या काही काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची सलगी वाढल्याचे दिसत आहे. तृणमुल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील एका कार्यक्रमात मेमन यांच्या तृणमुल प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मजीद मेमन हे तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व

खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू

  खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू प्रतिनिधी मुंबई - खंडाळा घाटात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे . मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला . अपघातग्रस्त वाहनामध्ये चालकासहित ९ जण होते . त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला . तर तीन जखमींमध्ये चालकाचा समावेश आहे . वसीम साजिद काझी ( रा . राजापूर , जि . रत्नागिरी ) , अब्दुल रहमान खान ( ३२ रा . घाटकोपर ) , अनिल सुनिल सानप , राहुल कुमार पांडे ( ३० , रा . कामोठे . नवी मुंबई ) , आशुतोष नवनाथ गाडेकर ( २३ म्हातारपाडा , मुंबई ) यांचा या अपघातात मृत्यू झाला .   मच्छिंद्र आंबोरे ( ३८ - चालक ) , अमीरउल्ला चौधरी , दिपक खैराल हे जखमी झाले आहेत . अस्फीया रईस चौधरी ( २५ , कुर्ला , मुंबई ) या बचावल्या आहेत .   पुण्याहून मुंबईकडे येताना हा अपघात झाला . चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने मागून अज्ञात वाहनाला धडक दिली व हा अपघात घडला . याबाबत अधिक तपास खोपोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाल

राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर देणार – मंगल प्रभात लोढा

इमेज
  राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर देणार – मंगल प्रभात लोढा मुंबई : रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  रायगड  विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांना  दिली. राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासाबाबत मंत्रालयात पर्यटन मंत्री श्री.लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे  आयोजन करण्यात आले. यावेळी रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, पर्यटन सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालनालयाचे संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी,सहसंचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री.लोढा म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याला सन २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा इतिहास रूपी माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील  तसेच  याठिकाणी लेझर शोचे देखील आयोजन करण्

मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन

इमेज
  मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन  प्रतिनिधी - मुंबई  : वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ देवो भव, ग्रंथ आमुचे साथी- ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती-अज्ञानाच्या अंधाऱ्याच्या राती, वाचन संस्कृती घरोघरी- तिथे फुलती ज्ञान पंढरी, पुस्तकांशी करता मैत्री- ज्ञानाची मिळते खात्री, असा संदेश देणारी ग्रंथ दिंडी काढत आजपासून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पूर्व), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 ला सुरूवात झाली. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीत अपर पोलिस आयुक्त संजय दराडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम नृत्य सादर केले. यावेळी लेखक डॉ.अच्युत गोडबोले, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, मुंब

विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्यात माझी कोणतीही भूमिका नाही,माझ्यावरील आरोप चुकीचे – राजन किणे यांचा खुलासा

इमेज
विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्यात माझी कोणतीही भूमिका नाही, माझ्यावरील आरोप चुकीचे – राजन किणे यांचा खुलासा  प्रतिनिधी  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही. याबाबत माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजन किणे यांनी केला आहे. आव्हाड यांच्या विरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात १२ वाजून २३ मिनिटांनी गुन्हा दाखल झाला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या घरी मध्यरात्री एक वाजता आले, याकडे किणे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्यामध्ये माझी कोणतीही भूमिका नाही, असे किणे म्हणाले.   सुनिता सातपुते यांना नगरसेविका पदी निवडून देण्यामध्ये माझी महत्त्वाची भूमिका राहिली आहे, त्यामुळे गद्दार मी आहे की कोण आहे याचा विचार बोलण्यापूर्वी करावा असे ते म्हणाले.   राजकारणात काम करताना महत्त्वाकांक्षा असणे साहजिक आहे त्यामुळे मला देखील आमदार बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे, जितेंद्र आव्हाडांनी संधी दिली तर राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढेन, असे सांगून राज

नागपूर विधिमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील : राहुल नार्वेकर

इमेज
  नागपूर विधिमंडळ परिसर विस्तारीकरणासाठी प्रयत्नशील :  राहुल नार्वेकर    नागपूर-  प्नतिनिधी  :  नागपूर विधिमंडळ परिसराचे विस्तारीकरण करण्याबाबत प्रयत्नशील असून याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे. तसेच अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती 'बारकोड ' पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. नागपूरमध्ये होऊ घातलेल्या डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसंदर्भात नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्रीपरिषद सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला.       या बैठकीला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सार्वजनिक

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

  जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर प्रतिनिधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंब्रा येथील वाय जंक्शन परिसरातील उड्डाण पुलाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमानंतर धक्का देऊन विनयभंग केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रामध्ये रास्तारोको आंदोलन केले. आव्हाड यांनी गुन्हा दाखल झाल्याने आमदारकीचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे दिला. त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल आव्हाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. आज न्यायालयात झालेल्या युक्तीवादात आव्हाड यांच्यावरील आरोप निखालस खोटा असून आव्हाड यांनी यापूर्वी कार्यक्रमात त्या तक्रारदार महिलेला बहिण म्हणून संबोधले असल्याचे त्यांनी न्याय

ऋता आव्हाड यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन, तक्रारदार महिलेविरोधात गुन्हा दाखल

  ऋता आव्हाड यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन, तक्रारदार महिलेविरोधात गुन्हा दाखल प्रतिनिधी – मुंब्रा जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा कायद्याचा दुरुपयोग असून याविरोधात लढा देणार असल्याचा पवित्रा आव्हाड यांच्या पत्नी व कोकण विभागीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा   ऋता आव्हाड यांनी घेतला आहे. सरकारने गलिच्छ राजकारण करु नये, असे त्या म्हणाल्या. तक्रारदार महिलेविरोधात ऋता आव्हाड यांच्याकडून मुंब्रा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने चुकीची तक्रार करुन आव्हाड यांची बदनामी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हा गुन्हा पोलिस न्यायालयात सिध्द झाला नाही तर पोलिसांविरोधात आम्ही न्यायालयात जावू असा इशारा ऋता आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्रा पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. चुकीच्या पध्दतीने दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.   महिलेविरोधात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरोधात

अंजली दमानिया यांचे आव्हाडांबाबतचे ट्वीट व्हायरल, खोटा गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

  अंजली दमानिया यांचे आव्हाडांबाबतचे ट्वीट व्हायरल,  खोटा गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी  प्रतिनिधी – मुंब्रा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा, कळवा मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांना समर्थन दिले आहे. विनयभंग ? काय वाट्टेल ते आरोप ? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे , पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा  असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे.  जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ३५४ दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करा. राजकीय दबावाखाली हे कृत्य केल्याबद्दल,  असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.  

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय

इमेज
  जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय प्रतिनिधी – मुंब्रा माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारीने याबाबत तक्रार केली होती. खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आव्हाड यांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त आक्रमक झाले असून ठाण्यात काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ करुन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंब्रा मध्ये देखील कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पोलिस स्थानकाजवळ निषेध केला आहे. रविवारी मुंब्रा बायपास येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी आव्हाड या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण

इमेज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा येथील  वाय जंक्शन उड्डाणपुलाचे लोकार्पण प्रतिनिधी - ठाणे : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा  होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, एमएमआरडीए आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते.  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले "एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या या  उड्डाणपुलाचा हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा  होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे. कल्याण डोंबिवली  महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याचे रुंदीकरण व