खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू

 

खंडाळा घाटातील अपघातात पाच जणांचा मृत्यू

प्रतिनिधी

मुंबई- खंडाळा घाटात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये चालकासहित जण होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमींमध्ये चालकाचा समावेश आहे.

वसीम साजिद काझी (रा.राजापूर, जि. रत्नागिरी), अब्दुल रहमान खान (३२ रा. घाटकोपर), अनिल सुनिल सानप, राहुल कुमार पांडे (३०, रा. कामोठे. नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (२३ म्हातारपाडा, मुंबई) यांचा या अपघातात मृत्यू झाला.  मच्छिंद्र आंबोरे (३८- चालक), अमीरउल्ला चौधरी, दिपक खैराल हे जखमी झाले आहेत. अस्फीया रईस चौधरी (२५ , कुर्ला, मुंबई) या बचावल्या आहेत.

 पुण्याहून मुंबईकडे येताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने मागून अज्ञात वाहनाला धडक दिली हा अपघात घडला. याबाबत अधिक तपास खोपोली पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कदम करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब