२६/११ शहीद जवानांच्या स्मरणार्थ शिव वाहतूक सेनेचे रक्तदान शिबीर


२६/११ शहीद जवानांच्या स्मरणार्थ शिव वाहतूक सेनेचे रक्तदान शिबीर 
प्रतिनिधी 
मुंबई- शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे आणि मीनाताई ठाकरे रक्त केंद्र (प्रबोधन रक्तवाहिनी) यांच्या विशेष सहकार्याने २६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज कार्निवल मॅाल, भगतसिंग नगर, गोरेगाव प. येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
 याप्रसंगी शिवसेना नेते-माजी मंत्री सुभाष देसाई, उपनेते अमोल किर्तीकर, शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस-भा.का.से चिटणीस निलेश भोसले, उपाध्यक्ष साजीद सुपारीवाला, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, विधानसभा संघटक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख भरत बोराडे, जितेंद्र इंगळे, सत्तार शेख उपस्थित होते. 

शिव वाहतूक सेनेचे गोरेगाव विभाग अध्यक्ष चंद्रकांत नायक यांच्या पुढाकाराने आयोजित या रक्तदान शिबीरात संघटनेच्या सभासद रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू वितरीत करण्यात आल्या.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही