राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांचा राजीनामा

 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार मजीद मेमन यांचा राजीनामा

प्रतिनिधी

मुंबई – ज्येष्ठ विधिज्ञ तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार एड मजीद मेमन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. मेमन हे गेल्या १६ वर्षांपासून राष्ट्रवादी मध्ये होते. २०१४ ते २०२० या कालावधीत ते पक्षातर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून कार्यरत होते. मेमन यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती त्यानंतर त्यांनी आज ट्वीट करत पक्ष सोडत असल्याची माहिती दिली आहे.



आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे आपण पक्ष सोडत असून शरद पवार व राष्ट्रवादी परिवाराकडून गेल्या १६ वर्षांत मिळालेले प्रेम व सहकार्य याबाबत त्यांनी आभार मानले आहेत. मेमन हे कोणत्या पक्षात प्रवेश करतात याबाबत उत्सुकता आहे.  


 

गेल्या काही काळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची सलगी वाढल्याचे दिसत आहे. तृणमुल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील एका कार्यक्रमात मेमन यांच्या तृणमुल प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मजीद मेमन हे तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही