ज्योती अळवणी यांची “अं त र” वेब फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला

ज्योती अळवणी यांची “अं त र” वेब फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला
प्रतिनिधी 

माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांनी लिहिलेली आणि निर्मित केलेली 'अंतर' ही  वेब फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . अनय म्हणजेच सुयश टिळक आणि श्रिया म्हणजेच आकांक्षा गाडे यांनी या वेब फिल्म मध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. देवेशच्या भूमिकेत अंकित म्हात्रे ने काम केले आहे. लग्नानंतर नात्यांमध्ये होणारे हळुवार बदल, वेळीस होणारी कोंडी, कधी होणारे प्रेमळ संवाद तर कधी येणारा दुरावा याबद्दल लेखिका ज्योती आळवणी यांनी या फिल्ममध्ये भाष्य केले आहे. 
प्रेमाच्या त्यातून येणाऱ्या दुराव्याच्या खऱ्या भावना उलगडणारं रोमँटिक गाण देखील या फिल्ममध्ये आहे. कृणाल राणे या तरुण दिग्दर्शकाने हे हळुवार नातं अलगद उलगडले आहे आणि संकलित देखील केले आहे. 

छायाचित्रण सुयश आचार्य  तर म्युजिक अभिमन्यू कार्लेकर आणि चेतन फेफरने केले आहे .ही फिल्म 25 नोव्हेंबर रोजी फिल्लंबाझ फिल्म कंपनी या युटुब चॅनेलवर रिलीज होते आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब