जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 

जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

प्रतिनिधी

विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंब्रा येथील वाय जंक्शन परिसरातील उड्डाण पुलाच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमानंतर धक्का देऊन विनयभंग केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर करण्यात आला आहे. आव्हाडांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रामध्ये रास्तारोको आंदोलन केले.

आव्हाड यांनी गुन्हा दाखल झाल्याने आमदारकीचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे दिला. त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल आव्हाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

आज न्यायालयात झालेल्या युक्तीवादात आव्हाड यांच्यावरील आरोप निखालस खोटा असून आव्हाड यांनी यापूर्वी कार्यक्रमात त्या तक्रारदार महिलेला बहिण म्हणून संबोधले असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. गर्दीत विनयभंग होऊ शकत नाही असा युक्तीवाद करण्यात आला.

अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी जर त्या महिलेला बाजूला केले नसते तर ती महिला माझ्या अंगावर पडली असती व मोठा गुन्हा दाखल झाला असा असता असे नियोजन झाल्याचा दावा केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही