जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय

 

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार

खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आमदारकीचा राजीनामा देण्याचा आव्हाडांचा निर्णय

प्रतिनिधी – मुंब्रा

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारीने याबाबत तक्रार केली होती. खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आव्हाड यांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त आक्रमक झाले असून ठाण्यात काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ करुन रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंब्रा मध्ये देखील कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पोलिस स्थानकाजवळ निषेध केला आहे.


रविवारी मुंब्रा बायपास येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी यांनी केला आहे. त्यामुळे मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही