ऋता आव्हाड यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन, तक्रारदार महिलेविरोधात गुन्हा दाखल

 

ऋता आव्हाड यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन,

तक्रारदार महिलेविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी – मुंब्रा

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा कायद्याचा दुरुपयोग असून याविरोधात लढा देणार असल्याचा पवित्रा आव्हाड यांच्या पत्नी व कोकण विभागीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा  ऋता आव्हाड यांनी घेतला आहे. सरकारने गलिच्छ राजकारण करु नये, असे त्या म्हणाल्या. तक्रारदार महिलेविरोधात ऋता आव्हाड यांच्याकडून मुंब्रा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने चुकीची तक्रार करुन आव्हाड यांची बदनामी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हा गुन्हा पोलिस न्यायालयात सिध्द झाला नाही तर पोलिसांविरोधात आम्ही न्यायालयात जावू असा इशारा ऋता आव्हाड यांनी दिला आहे. मुंब्रा पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. चुकीच्या पध्दतीने दाखल झालेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

 महिलेविरोधात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरोधात मुंब्रा पोलिस स्थानकात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ च्या कलम ३ (१) (r), ३ (१) (y), ३ (१) (za) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २६ ऑक्टोबर रोजी छटपुजेच्या वेळी मुंब्रेश्वर मंदिर येथे या महिलेने जातीवाचक शिव्या देवून धक्काबुक्की करुन हाकलल्याविरोधात हा गुन्हा नोंद झाला आहे. तसेच रविवारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पुन्हा जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, ऱाष्ट्रवादीच्या नेत्यांचे आवाहन

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या खोट्या  गुन्ह्याप्रकरणी त्यांनी राजीनामा देऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे आवाहन केले आहे.

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही