अंजली दमानिया यांचे आव्हाडांबाबतचे ट्वीट व्हायरल, खोटा गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

 

अंजली दमानिया यांचे आव्हाडांबाबतचे ट्वीट व्हायरल, 

खोटा गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी 

प्रतिनिधी – मुंब्रा

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंब्रा, कळवा मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्वीट करुन जितेंद्र आव्हाड यांना समर्थन दिले आहे.

विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा

 असे ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे.

 जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ३५४ दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करा. राजकीय दबावाखाली हे कृत्य केल्याबद्दल,  असे ट्वीट दमानिया यांनी केले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब